पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
इस्लाम आणि संस्कृति


यशस्वी रीतीने राज्यशकट हांकण्याचे श्रेय त्यांनी मिळविले आहे. इराणमध्ये तर अनेक स्त्रियांनी राज्य चालविले आहे. त्यांमध्ये पादशहा खातून, लाला खातून, तंदू या विशेष प्रसिद्ध आहेत. मध्यः इराणचा बादशहा मजदूदद्दौला यांच्या मातोश्री सय्यदा यांनी कित्येक वर्षे राज्य केले. दौलत खातून या खुर्शि दिया घराण्यांत प्रसिद्ध असून त्या कार्यक्षम व हुषार राज्यकर्त्या म्हणून नावाजलेल्या आहेत. इजिप्तमध्ये होऊन गेलेल्या शजरतुत दूर या राज्ञीचें नांव तर अमर झाले आहे. ती साधी गुलामकन्या पण आपल्या असामान्य कर्तृत्वाने राज्यसत्ता मिळवून ईजिप्तची राज्ञी होण्याचा तिने मान मिळविला. सुलतान सलाहुद्दीन यांची पुतणी सफीया खातून राजकारणधुरंधर म्हणून प्रसिद्ध आहे. तिने सीरियावर स्वतंत्रपण राज्य केले आहे. हिंदुस्थानमध्ये रझिया, नूरजहान, चांदबिबि, बिबी राजी, नादिरा बेगम यांनी राज्य केल्याचे सर्वांना माहित आहेच.

 तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र वगैरे क्षेत्रांत अनेक मुस्लिम विदुषी होऊन गेल्या. हजरत पैगंबरांच्या पत्नी हजरत आयेषा यांच्या विद्वत्तेबद्दल अनेक पंडितांनी धन्योद्गार काढले आहेत. कित्येक मस्लिम पंडित त्यांच्याजवळ इस्लामी कायद्याचे ज्ञान घेत. इब्राहीम मक्यसी, जमालुद्दिन अहंमद तिब्रीस्तानी या विद्वानांच्या कन्यका ' फातिमा या एकाच नांवानें नामांकित विदुषी म्हणून ओळखल्या जातात. बगदाद येथे अब्बास नांवाचा पंडित होता. त्याच्याही कन्येचें नांव फातिमा होते. त्या मशिदीमध्ये धर्मशास्त्रावर प्रवचनें करीत. त्या इतक्या विद्वच्छेष्ठ होत्या की, आपण त्यांच्याशी वादविवाद करू शकत नाही असे त्या काळच्या सद्रुद्दिन नांवाच्या जाड्या पंडिताने