पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

१०९



गलितधैर्य सैनिकांच्या अंगी त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने वीरश्री भरली आहे. त्या प्रत्यक्ष रणांगणावर हातांत समशेर घेऊन लढत. जमाल नांवाने ओळखल्या जाणाऱ्या युद्धांत त्या निर्भयपणे लढल्या आहेत. त्या लढाईत अनेक सैनिकांनी काढता पाय घेतला असतां त्यांनी धीरोदात्त वृत्तीने शत्रूशी लढा दिला आहे.

अस्मा या हजरत आयेषा यांच्या थोरल्या भगिनी होत. सीरियामध्ये रोमन लोकांविरुद्ध झालेल्या भीषण लढाईत त्या आपले पती झुबैर यांच्या खांद्याशी खांदा लावून लढत होत्या. एकदा त्यांचा मुलगा अबदुल्ला आपल्या सैन्यासह मकेमध्ये शत्रकडून वेढला गेला. शत्रची कोंडी फोडण्याचे सर्व प्रयत्न वायां गेल्यानंतर त्याने आपल्या आईला शत्रूला शरण जाऊ का असे विचारले. त्या सरशी अस्मा म्हणाल्या, “ शत्रला शरण जाऊन आपल्या खानदानचें नांव कलंकित करण्यापेक्षा हातांत तलवार घेऊन वीराचे मरण पत्कर." हजरत पैगंबरांच्या आत्या सफीया यांनी मदिनेच्या आसमंतांत झालेल्या अनेक लढायांत भाग घेतला होता. हरीस यांच्या कन्या उम्मुल खैर या हजरत अलीसह सिफेन नांवाच्या लढाईत प्राणपणाने लढत होत्या. अमीया गप्फारी या शूर स्त्रीने हजरत पैगंबरांच्या नेतृत्वाखाली, शत्रंना दाद न देतां जखमी झालेल्या सैनिकांची शुश्रूषा केली आहे. उम्मी नसीबा, उम्मी सल्मा या रणमर्द स्त्रियांनी तर हजरत पैगंबरांना वाचविण्याकरितां आपल्या पराक्रमाची शर्थ केली. झुबैर यांच्या भगिनी जयनब, अस्मा अन्सारी, खोला, आगा बेगी, जरका, सौदा अशा अनेक शूर स्त्रिया इस्लामच्या इतिहासांत आढळून येतात.
 मस्लिम स्त्रियांनी राजकारणांत भाग घेतलाच पण स्वतंत्रपणे व