पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
इस्लाम आणि संस्कृति


 सर्व म्हणजे चारी स्त्रियांशी भेदभाव न करतां वागले पाहिजे. अमुक एक आगडती किंवा दुसरी नावडती असा भेदाभेद करता कामा नये. सर्वांना सारखी वागणूक दिली पाहिजे, सर्वांवर सारखें प्रेम केले पाहिजे; आणि असे जर होत नसेल, सर्व स्त्रियांशी सारख्या न्यायाने वागणे जमत नसेल तर फवा-हिदतन्' म्हणजे फक्त एकाच स्त्रीबरोबर लग्न करा असा पवित्र कुराणचा आदेश आहे. नवऱ्याच्या मर्जीतल्या एकाच स्त्रीने सुखांत राहावे आणि बाकीच्या तीन स्त्रियांना मानसिक त्रास, उपमर्द किंवा अन्याय सोसावा लागावा ही गोष्ट पवित्र कुराणच्या आदेशाविरुद्ध असल्यामुळे एकपत्नी व्रत हेच श्रेयस्कर ठरते.

 मुस्लिम स्त्रियांचे अस्तित्व चार भिंतींपलिकडे दिसून येत नाही असा जो प्रवाद आहे तो सर्वस्वी निराधार आहे. केवळ अज्ञानामुळेच तो फोफावं शकला असें आपणांस म्हणावें. लागेल. मुस्लिम स्त्रियांचे कर्तृत्व फक्त चूल आणि मूल . यांपुरतेच मर्यादित नसून राजकारण, समाजकारण, तत्त्वज्ञान, वक्तृत्व इत्यादि क्षेत्रांत त व्यापून राहिले आहे. विशेषतः प्रत्यक्ष रणांगणांवर त्यांनी दाखविलल शौर्य व पराक्रम यांची नोंद इस्लामी इतिहासांत सोन्याच्या अक्षराना करण्यांत आली आहे. हजरत पैगंबरांच्या कुटुंबांतील स्त्रिया अत्यत पुढारलेल्या होत्या. हजरत पैगंबरांच्या प्रिय पत्नी हजरत आयेषा या तर नावाजलेल्या विदुषी आणि कवियित्री होत्या. त्यांच्या विद्वत्तबद्दल अनेकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत, त्यांचे वक्तृत्व इतक अमोघ व श्रेष्ठ दर्जाचे होते की, खलिफा मुआविया यांनी ' हजरत आयेषाइतकें अव्वल दर्जाचें वक्तृत्व अद्याप माझ्या तरी ऐकण्यात आले नाही' असे उद्गार काढले आहेत. रणांगणांतून पळत सुटलेल्या