पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०६
इस्लाम आणि संस्कृति



प्रसूत होईपर्यंत तिचा संभाळ नवऱ्याने केला पाहिजे. त्या अपत्याचे संगोपन करण्याकरितां नवयाने सर्व खर्च करावा लागतो.
 घटस्फोट देतांना नवऱ्याने आपल्या पत्नीशी किती सहृदयतेने वागावे लागते याचे हृद्यं वर्णन अल-गइझाली यांनी केले आहे. ते. म्हणतात, “ घटस्फोट द्यावयाचा झाला तर मनुष्याने अत्यंत सहृदयतेने वागले पाहिजे. राग, द्वेष किंवा काहीं "एक कारण जसतां घटस्फोट देता येणार नाही. घटस्फोट दिलाच तर त्याने आपल्या पत्नीला उदरनिर्वाहाकरितां देणगी दिली पाहिजे. अमुक कारणाकरितां पत्नीला घटस्फोट द्यावा लागला याचा परिस्फोट त्याने कंधीही करता कामा नये. एकदां एका गृहस्थाने प्रथम घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर त्याला दुसऱ्या एका उपद्व्यापा गृहस्थाने आपण घटस्फोट कां देत आहांत असे विचारले. ता गृहस्थ उत्तरला. मी माझ्या पत्नीचे गुपित उघड करू इच्छित नाही. घटस्फोट परिपूर्ण झाल्यानंतर तोच प्रश्न विचारण्यात आल्यावर तो गर्हस्थ म्हणाला, "आता माझ्या पत्नीचा व माझा काही संबंध नसल्यामुळे तिच्या खाजगी गोष्टीची वाच्यता करण्याच मला कांहींच कारण नाही."
 इस्लाममध्ये पतीप्रमाणे पत्नीलाही घटस्फोट देण्याचा अधिकार आहे. या घटस्फोटास ' खुला ' अशी संज्ञा असून पवित्रं कुराणच्या • अन्-निसा या अध्यायामधील २२९ ऋचेत त्याचा उल्लख करण्यांत आला आहे. बायकोशी पटत नाही म्हणून नवऱ्याने तिला घटस्फोट द्यावा आणि नवथाशी जमत नसले किंवा त्याच्यामध्य सदैव खटके उडत असले तर तिला मात्र नवऱ्याच्या जाचांतून मुक्त होतां येऊ नये ही निव्वळ अन्यायाची गोष्ट आहे. हा अन्याय दूर