पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४
इस्लाम आणि संस्कृति



ture ) इस्लामला मंजूर नाही. तिच्या संपत्तीवर सर्वस्वी तिचा हक्क असतो. नवऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय आपल्या संपत्तीचा विनियोग ती करूं शकते. पत्नीने स्वतःच्या परिश्रमावर मिळविलेल्या संपत्तीची उधळपट्टी करण्याचा पतीला अधिकार नाही किंवा तिला क्ररपणे वागविण्याचा हक्क नाही. सर विल्यम जोन्स आणि सर सय्यद अमीर अली या विख्यात कायदेपंडितांनी मुस्लिम कायद्यावर लिहिलेले ग्रंथ या दृष्टीने अभ्यासण्यासारखे आहेत.

 पुरुषांना घटस्फोटाचा अधिकार आहे; पण या अधिकाराचा वापर सहसा होणार नाही अशी बंधने घालण्यात आली आहेत. 'घटस्फोट जरी कायदेशीर असला तरी तो परमेश्वरास पसंत नाही' असे हजरत पैगंबरांनी उद्गार काढले आहेत. घटस्फोट द्यावयाचा ठरला तर स्त्रीवर्गाला घटस्फोटानंतरची झळ लागं नये अशा खबरदारी घेण्यांत आली आहे. घटस्फोट ही बाब अत्यंत खासगी स्वरूपाची समजण्यांत येते. भर कोटींत. जाऊन स्त्रियांची मानहानि होईल अशी घटस्फोटाची कारणे सांगण्याचा पुरुषांना अधिकार नाही. मी तुझ्याशी काडीमोड केली आहे असें नवऱ्याने एकाच वेळी सांगण्याने घटस्फोटाला कायदेशीर स्वरूप येत नाही किंवा तो तडकाफडकी होऊ शकत नाही. घटस्फोट परिपूर्ण व्हावयास तीन महिन्यांचा अवधी जावा लागतो. महिन्यांतून एक वेळ या प्रमाणे तीन वेळां 'मी तुला घटस्फोट दिला आहे ' अशा शब्दात घटस्फोट उच्चारावा लागतो. घटस्फोट उच्चारतेवेळी ती स्त्री रजस्वला नसली पाहिजे. पहिल्या प्रथम घटस्फोटाचा उच्चार केल्यानंतर तान महिनेपर्यंत नवराबायकोनें एकाच घरी व व्रतस्थ राहिले पाहिज. तीन महिन्यांमध्ये तीन वेळां घटस्फोट उच्चारल्यानंतर तो घटस्फोट