पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

१०३


नाही किंवा तिची उधळपट्टीही करता येत नाही. स्वतःचा पती निवडण्याचा तिला संपूर्ण अधिकार आहे. पैशाच्या, मोठेपणाच्या किंवा मानसन्मानाच्या आहारी जाऊन आपण सांगं त्यांच्याशींच आपल्या मुलीने लग्न केले पाहिजे अशी तिच्या बापास सक्ति करतां येत नाही. प्रत्यक्ष लग्नविधीच्या समयीं तिची संमति विचारण्यांत येते. तत्प्रसंगी आपणांस वर पसंत नाही असे तिने सांगितले तर लग्न रद्द होते. मुलगी अल्पवयी असली तर लग्नास बापाची संमति लागते. आपला स्वार्थ साधण्याकरितां बापानें अल्पवयांतच मुलीचें लग्न करावयाचे ठरविले तर मुस्लिम कायद्याने तिला आणखी एक संरक्षण दिले आहे. लग्न झाल्यानंतर ती वयांत आली आणि झालेला लग्नसंबंध नकोसा वाटला तर ते लग्न रद्द होते. वयांत आलेल्या मुलीला लग्नाच्या वेळी व अल्पवयी मुलीला वयांत आल्यावर लग्नानंतर आपणास सदर विवाह मान्य आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार देण्यांत आला आहे हे वाचकांच्या लक्षात येईलच.
 लग्नानंतर मुस्लिम मुलीचे व्यक्तित्व नष्ट होत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न झाले म्हणून समाजामधील स्वतंत्र व्यक्ति म्हणून वावरावयाचें बंद होत नाही, किंवा तिचें व्यक्तित्व नवऱ्याच्या व्यक्तित्वांत लोप पावत नाही. पतीच्या घरी आल्यानंतरहीं, समाजाची घटक या नात्याने जितके हक्क एकाद्या व्यक्तीला असतात तितके सर्व हक्क तिला मिळू शकतात. आपल्या नांवावर ती करारमदार करूं शकते. या बाबतींत पतीला ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. एकाद्या व्यक्तीविरुद्ध ती स्वतंत्रपणे न्यायालयांत जाऊ शकते. त्याकरितां नवऱ्याचे सहकार्य घ्यावयाची तिला आवश्यकता नाही. नवऱ्याच्या नावाखाली वावरण्याचे तत्त्व ( Doctrine of cover-