पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
इस्लाम आणि संस्कृति



 पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही हक्क असू शकतात हे इस्लामने जाहीर करण्याचे औदार्य दाखविले आहे. आपल्या शब्दाप्रमाणे त्यांनी वागलेच पाहिजे, आपल्या इच्छापूर्तीकरितां स्त्रियांनी आपल्या आशाआकांक्षा आणि हक्क यांचा होम केला पाहिजे. ही पुरुषांची मिरासदारी इस्लाम मान्य करीत नाही. स्त्रियांना आपली कर्तव्ये काय आहेत हे त्यांना पूर्णपणे माहित आहे; आपल्या हक्कांची त्यांना जाणीव आहे. त्यामध्ये हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करण्याचा पुरुषांना अधिकार नाही.

 " स्त्रियांचे हक्क पवित्र आहेत. त्यांना दिलेले हक्क अबाधित राहतील अशी खबरदारी घ्या."

-हजरत मुहम्मद पैगंबर


 स्त्रियांचे हक्क पवित्र असून त्यांची पायमल्ली होणार नाही अ आपण खबरदारी घेतली पाहिजे. वयांत आल्याबरोबर, स्वतंत्र व्यात या दृष्टीने जितके हक्क मिळतात तितके सर्व हक्क कायद्याने स्त्रियान देण्यांत आले आहेत. एक आंग्ल विदुषी म्हणते, " पवित्र कुराणा स्त्रियांच्या जीवनांत विलक्षण क्रांति घडवून आणली आहे. कायदा कानच्या इतिहासांत पहिल्या प्रथमच स्त्रीपुरुषांमधील समतेचा हा देण्यांत आला आणि तो परिणामकारक रीतीने अंमलात आणला गेला."*

 इस्लाम धर्मांत आईबापांच्या इस्टेटीवर तिच्या भावाप्रमाणे तिचाहा पण हक्क आहे. कौटंबिक मिळकतींत तिला वांटणी मिळतं. झाल्यानंतरही तिच्या इस्टेटींत नवऱ्याला ढवळाढवळ करता येते


* "Women Under Islam " by Miss Garnatt, P. 21.