पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
इस्लाम आणि संस्कृति


निश्चय करणे ही धर्मबाह्य कृत्ये आहेत असे प्रत्येक मुस्लिमानें समजले पाहिजे.

" पत्नीशी वागतांना परमेश्वराची भीति बाळगा; त्या तुमच्या साहाय्यक आहेत. परमेश्वराच्या जमानतीवर तुम्ही तिचा स्वीकार केला आहे."

-हजरत मुहम्मद पैगंबर । आपल्या पत्नीला आपण वाटेल तसे वागविलें तर आपणांस कोण विचारणार आहे या उर्मटपणास इस्लाममध्ये स्थान नाही. आपण पत्नीचा स्वीकार करतो तो परमेश्वराच्या जमानतीवर. उद्या आपण आपल्या पत्नीस वाईट रीतीने वागविलें तर परमेश्वर आपणास जबाबदार धरील ही भीति आपण सदैव मनांत बाळगली पाहिज. स्त्री ही आपली साहाय्यक आहे, मदतनीस आहे. आपल्या साहाय्यकाला आपण दुखविले किंवा वाईट रीतीने वागविले तर त्याच्यापासून अंतःकरणपूर्वक मदतीची किंवा साहाय्याची अपेक्षा करितां येईल काय ? पत्नीला वागवितांना हे विचार मनांत सदव बाळगले पाहिजेत.
 " मुस्लिम म्हणविणाऱ्याने आपल्या पत्नीचा द्वेष करूं नये; तिच्या एकाद्या खोडीमुळे नाखुष असेल तर त्याने तिच्या इतर सद्गुणांकडे पाहून प्रसन्नचित्त व्हावें."

-हजरत मुहम्मद पैगंबर


 कोणतीही स्त्री घेतली तर तिच्यामध्ये एकादें न्यून दिसून यण साहजिक असते. पण त्यालाच महत्त्व देऊन आपल्या पत्नीबद्दल राग किंवा द्वेष बाळगणे कदापिही योग्य ठरणार नाही. तिच्या अगा