पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

९९



अशी हजरत पैगंबरांनी शिकवण दिली आहे. तिच्यावर रागावणे किंवा तिला दुखविणे ही गोष्ट त्यांना संमत नाही. मलींबद्दल त्यांनी केवढ्या हळुवार भाबना प्रदर्शित केल्या आहेत हे पैगंबरांच्या खालील वाक्यावरून सिद्ध होते.
 “ सद्गुणांमध्ये श्रेष्ठ सद्गुण कोणता आहे ? घटस्फोट झाल्यानंतर असाहाय्य परिस्थितीत तुमच्या घरी परत येणाऱ्या तुमच्या मुलीस दयार्द्रतेने वागविणे हाच तो श्रेष्ठ सद्गुण होय."

-हजरत मुहम्मद पैगंबर


 पत्नीबद्दलही विलक्षण आदराची भावना बाळगण्यास इस्लाम शिकवितो. पत्नी म्हणजे आपण सांगं तसे वागणारी किंवा आपली लहर सांभाळणारी दासी नसून आपल्या जिवास जीव देणारी मैत्रीण संकटकाली आपल्या साहाय्यास धावून येणारी मदतनीस आहे असें आपण समजले पाहिजे. तिची थोर भूमिका समजावून घेऊन तिला मोठया सन्मानाने वागविले पाहिजे. तिच्याकडे तच्छतेने न पाहतां आपल्या बरोबरीचें स्थान तिला दिले पाहिजे. एकदा एका खाष्ट गहस्थाने आपल्या पत्नीला कसे वागवावें असें हजरत पैगंबरांना विचारल्यानंतर हजरत पैगंबर म्हणाले, " ज्या वेळी तुम्ही खाता त्या वेळी तिला खावयास द्या; ज्या वेळी तुम्ही कपडे करतां त्य, वेळी तिलाही कपडे करा; तिला मारूं नका किंवा शिवीगाळ करूं नका: किंवा नाराज होऊन तिच्यापासून विभक्त राहूं नका." आपणांस सुग्रास भोजन आणि आपल्या पत्नीस कदान्न, आपणांस चांगले कपडे आणि पत्नीस ठिगळ लावलेली गोधडी ही गोष्ट आपणांस असह्य वाटली पाहिजे. तिला मारपीट करणे, शिव्या देणे किंवा रागावन तिचे तोंड देखील पाहावयाचे नाही असा निर्धण