- पवित्र कुराण २४:२३.
स्त्रियांची बदनामी करणारा या जगांत धिक्कार तर पावतोच पण परलोकांतही त्याला या पापाबद्दल जबाबदार धरले जाते; यावरून त्याचे हे पाप किंवा अधम कृत्य किती अक्षम्य असले पाहिजे याची आपणांस कल्पना येते. पवित्र कुराणच्या 'अल हमझा' या अध्यायामध्ये निंदाखोर व बदनाम करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.
इस्लामच्या उदार शिकवणीमुळे जनतेचा दृष्टिकोण अजिबात बदलून गेला; तिच्या स्त्रीविषयक विचारप्रणालीत आमूलाग्र फरक झाला. जेथे मुलीला दफन करण्याची प्रथा होती तेथे मुलीच्या जन्माचा सोहळा मोठ्या थाटाने करण्यांत येऊ लागला. मुस्लिम कुटुंबात मुलीच्या जन्माचे स्वागत कपाळावरील आठ्या व सुस्कारे यांऐवजी आनंदोत्सवाने करण्यांत येऊ लागले. मुलांइतकेंच किंबहुना मुलापेक्षा जास्त लाड व कौतुक करून घेण्याचे भाग्य मुस्लिम कन्यकांना लाभू लागले.
-हजरत मुहम्मद पैगंबर
आपल्या मुलींना ममतेने वागविणे हे स्वर्गप्राप्तीचे साधन आहे