पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

९७



करतेवेळी मांगल्य व चांगुलपणा यांचा भरपूर उपयोग केल्यामुळे त्या जातीची अवहेलना करणे किंवा तिच्याशी दुष्टपणाने वागणे म्हणजे परमेश्वरास प्रिय असणाऱ्या व्यक्तीबद्दल तिरस्कार व्यक्त करण्यासारखें आहे. स्त्रियांना दुखवून परमेश्वराला नाराज न करता, त्यांच्याशी अत्यंत सहानुभूतीने व प्रेमळपणाने वागणे हे प्रत्येक मुस्लिमाचें कर्तव्य आहे.

" स्त्रियांना चांगल्या त-हेने वागवा अशी परमेश्वराची आज्ञा आहे."


-हजरत मुहम्मद पैगंबर


 स्त्रियांना वाईट रीतीने वागविणे म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेचा । अवमान करण्यासारखे आहे असा स्पष्ट इशारा हजरत पैगंबरांनी दिला आहे. स्त्रियांच्या भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य करण्यापासून मनुष्याने परावृत्त झाले पाहिजे. निष्पाप व सालस स्त्रियांची बदनामी हे त्यांच्या वर्मी लागणारे शल्य होय. बदनामी करणारा नीच गृहस्थ कांहीतरी अभद्र बोलून जातो, त्याचे शब्द हवेत विरतात, पण स्त्रियांच्या अंतःकरणावर त्यामुळे केवढी खोल जखम होते याची त्याला कल्पनाही नसते. अशा असभ्य मनुष्याच्या मनगटास पकडन बदनामी कां करतोस असे विचारणे त्यांना शक्य होत नाही. कायदा निसरडा असल्यामुळे कायद्याने त्या माणसाचा बंदोबस्त करणे दुरापास्त ठरते. त्यांच्यापुढे एकच मार्ग म्हणजे व्यथित अंतःकरणाने अश्रु ढाळणे हा होय. स्त्रियांना बदनाम करणाऱ्या व्यक्तीबद्दल इस्लामला विलक्षण चीड वाटते. अशी व्यक्ति अब्बल दर्जाची नीच व बदमाश समजून त्याच्यापासून चार हात दूर राहण्याची इस्लामची आज्ञा आहे.

इ.सं.७