पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इस्लाम आणि समाजशास्त्र

९५


 आतांपर्यंत झालेल्या विवेचनावरून इस्लाममधील बंधुता व समता किती विश्वव्यापी आहे याची सर्वसाधारण कल्पना येईल. अखिल हिंदुस्थानास भूषणभूत होऊन राहणारे विख्यात तत्त्वज्ञ सर राधाकृष्णन् यांनी आपल्या East and West in Religion या ग्रंथांत पुढील शब्दांमध्ये धन्यवाद दिले आहेत. "दुसऱ्या कोणत्याही धर्मांत दिसून न येणारी इस्लाम धर्मांतील बंधुता ही जात व राष्ट . यांच्या सर्व मर्यादा ओलांडणारी आहे हे आपण नाकबूल करूं शकत नाही."

स्त्रीदाक्षिण्य


 इस्लाममधील समाजशास्त्राने त्या काळी सर्वत्र रूढ असलेल्या स्त्रीविषयक कल्पना पार बदलून टाकून जगामध्ये एक फार मोठी क्रांती करून टाकली आहे. अपमानित व पददलित झालेल्या स्त्रीवर्गाला समाजामध्ये मानाचे व वैभवाचे स्थान प्राप्त करून देण्यांत इस्लामनें अग्रपूजेचा मान मिळविला आहे असे विधान केले तर ते मळीच अतिशयोक्तीचे होणार नाही. त्या काळी अरबस्तानाबरोबरच सर्व जगांत स्त्रीजातीचा केवढा अपमान होत असे हे आपण पहिल्या प्रकरणांत पाहिले आहे. स्त्रियांच्या या अक्षम्य अवहेलनेमळे समाज कमकवत बनत आहे, तो अधोगतीला जात आहे हे इस्लामने बरोबर ओळखले. स्त्री ही समाजाची अर्धी शक्ति आहे; ती शक्ति वायां जाऊं लागली तर समाज बलवान बनणे किंवा त्यामध्ये स्थैर्य येणे कदापिही शक्य नाही. स्त्रियांना दास्यांत ठेवणे याचा अर्थ समाजास विकलांग करणे होय. समाजसंस्था मजबूत व उन्नत करावयाची असेल तर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने व तितक्याच इज्जतीने