पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
इस्लाम आणि संस्कृति



लागले. त्यांचा सामाजिक दर्जा वाढविण्याचे आणखी एक श्रेष्ठ कार्य हजरत पैगंबरांनी केले आहे व तें म्हणजे त्यांच्याशी बेटीव्यवहार होय. या श्रेष्ठ कार्याची सुरुवात प्रथम आपल्या घरींच करून हजरत पैगंबरांनी साऱ्या जगास थक्क करून सोडले. त्यांनी आपल्या आतेबहिणीचे लग्न झैद नांवाच्या गुलामाशी करून आपले विलक्षण नीतिधैर्य प्रकट केले. हजरत पैगंबरांच्या आतेबहिणीशी लग्नसंबंध व्हावा म्हणून अरबस्तानांतील अत्यंत संदर, श्रीमान् व थोर घराण्यांतील युवकांमध्ये स्पर्धा लागली होती. हजरत पैगंबरांना केवळ तत्त्वाकरितां त्या सर्वांस नकार दिला. हजरत पैगंबरांचे घराण केवढे थोर, त्यांचा दर्जा केवढा मोठा, त्यांची योग्यता केवढी श्रेष्ठ, पण सदैव लाथाडल्या जाणाऱ्या एका बहिष्कृत गुलामास आपला बहीण देऊन, इस्लाम धर्मांत केवढी श्रेष्ठ दर्जाची समता असू शकत हैं त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. हजरत पैगंबरांच्या या औदार्यामुळेच माणुसकीला पारखा झालेला गुलाम पुन्हां समाजात माणूस म्हणून वावरूं लागला; कुटुंबांत त्याला बरोबरीचे स्थान मिळाले. ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या ४५ व्या भागांत " गुलामाना कटंबांतील मंडळीप्रमाणे वागविण्यांत येऊ लागले" असे उद्गार काढण्यात आले आहेत.

 त्या काळी लढाईंत कैदी केलेल्या लोकांना गुलाम करण्यांत येई. हजरत पैगंबरांनी ही निर्घण पद्धत बंद करून टाकली. लढाईत कैदी झालेल्या कित्येक लोकांना गुलामगिरीच्या खाईत न लोटता, त्यांनी स्वातंत्र्य देऊन टाकले आहे. बनी मुस्तालिकंचे जे कैदी होत त्यांची मुक्तता करण्यांत आली. हवाझीनचे सहा हजार कैदी हात त्यांनाही पण स्वातंत्र्य देण्यांत आले. लढाईतील कैदी, गुलाम