इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य हिंदु तत्त्वज्ञानाची अगतिकता | दलितांचा पाठिंबा ज्या कार्यक्रमाला मिळतो त्या कार्यक्रमाच्या पाठीशीं आयुष्याचा प्रतिक्रियात्मक विचार करणारे तत्त्वज्ञान असणारच नाही. ज्या अर्थी हिंदी जनतेचा पाठिंबा इस्लामच्या सामाजिक कार्यक्रमाला मिळाला त्या अर्थी त्याच्या पाठीमागचे तत्त्वज्ञान हिंदु तत्त्वज्ञानापेक्षा चांगले असलेच पाहिजे. हिंदु तत्त्वज्ञान व त्या वेळची सामाजिक स्थिति इतकी गोंधळाची झाली होती की, त्यांतून बाहेर निघण्यास इस्लामने मार्ग दाखवतांच जनता त्या वाटेने गेली. वरील विधानाने हॅवेलने हे म्हणणे मान्य केल्यासारखेच आहे की, तेराव्या व चौदाव्या शतकांतही सामाजिक क्रांतीचे मुसलमानांचे कार्य संपले नव्हते. त्याच गुणामुळे त्याची बीजे हिंदुस्थानांत रुजली व त्यांस अनेक अनुयायी लाभले. हिंदी पुराणाभिमानाचे दृष्टीने पाहतां मुसलमानी धर्म त्याच्या पडत्या काळांतही आध्यात्मिक, तत्त्वज्ञानात्मक के सामाजिक प्रगतीचाच निदर्शक होता. हिंदुस्थानची राजकीय अधोगति मानवी बुद्धीचे उदात्त फळ म्हणजेच हिंदु-युरोपीय संस्कृति आहे। असे मानून त्यांची स्तुति करणा-यांपैकी हॅवेल हा एक होता. मुसलमानांच्याबद्दल त्याच्या मनांत अगदी उलट भावना होत्या. हिदबद्दलचे त्याचे मत पूर्वग्रहदूषित होते असे मानावयाचे कारण नाही. किंबहुना तो हिंदूचाच पक्षपाती होता, मग त्याच्यासारख्या इतिहास कारासही अतिशय वाईट गोष्टी येथे दिसल्या तर मग तेथील परि स्थिति खरोखरीच किती वाईट असेल याची कल्पनाच करणे बरे : तो लिहितो, " हिंदुस्थानांत इस्लामचे पाऊल पुढे पडले याचे खर कारण कोठे बाहेर शोधावयास नको. हर्षाचे मृत्यूनंतर आर्यावर्तात राजकीय अधोगति झाली. त्यामुळेच येथे इस्लाम धर्माची ध्वजा रोवली गेली. महंमदाच्या सामाजिक कार्यक्रमामुळे प्रत्येकास समान १०२
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/97
Appearance