इस्लाम व हिंदुस्थान धर्मातराची मीमांसा हिंदु संस्कृतीचा निष्ठावंत भक्त हॅवेल याचें इस्लाम-प्रसाराबद्दलचे मत अत्यंत उद्बोधक आहे. तो मुसलमानांसंबंधी सहानुभूति दाखवील अशी शंका येण्याससुद्धां जागा नाहीं. “ज्यांनी इस्लामधर्म स्वीकारला त्यांना मुसलमान रहिवाश्यांचे सर्व हक्क मिळाले. मुसलमानी दरबारांत सर्व भांडणे कुराण कायद्याप्रमाणे आर्य--विधींनीं नन्हेतोडली जात असत. यामुळे खालच्या वर्गात धर्मांतर फारच लवकर होत असे. विशेषतः ब्राह्मणांचे स्पृश्यास्पृश्यतेचे नियम ज्यांना जाचक होत ते तर फारच जलद स्वधर्म सोडीत असत." —हिंदुस्थानांतील आर्याचे राज्य. ज्याचा विश्वास ब्राह्मणविधि परिपूर्ण व उत्कृष्ट असा होता त्याचे हे मत आर्यांना अभिमानास्पद खास नाहीं. एवढे खरें कीं, त्या वेळी असे असंख्य लोक असावेत की, ज्यांना हिंदु धर्म व ब्राह्मण रूढी यांना चिकटून राहावयाला कांहींच कारण नव्हते. स्वधर्म सोडूनही हिंदूंच्या प्रतिगामी वर्गाच्या जुलुमापासून संरक्षण करील अशा इस्लाम धर्माचा आश्रय घेण्यास ते अगदीं सुसज्ज असत. 5 = सामाजिक कार्यक्रम हॅवेलनें महंमदाच्या शिकवणीस ‘आध्यात्मिक महत्त्व विशेष नाहीं असे म्हटले आहे; पण तेथेच त्याने त्या तत्त्वांचा हिंदुस्थानांत कसा प्रचार झाला याबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. * इस्लामच्या तत्त्वज्ञानापेक्षा त्याचा जो सामाजिक कार्यक्रम होता त्यामुळेच हिंदुस्थानांत त्याचे पुष्कळ अनुयायी झाले आहेत. अर्थात् जनतेला तत्त्वज्ञान हे कळतच नाहीं. त्यांना असा कांहीं ‘ सामाजिक कार्यक्रम' लागतो की, त्यामुळे जीवनाची साधने व भोंवतालची परिस्थिति सुधारली कीं पुरे ! १०१
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/96
Appearance