पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लाम व हिंदुस्थान आध्यात्मिक स्थिति लाभली. इस्लाम धर्माला राजकीय व सामाजिक क्रियांचे एकीकरण करून थोडेसे साम्राज्यसेवेचे कार्य निर्माण करतां आले आहे. या जगांत राहून मनुष्यास पुरेसे सुख मिळेल असेच जीवनाचे नियम इस्लाम धर्मात आहेत. बुद्ध तत्त्वज्ञान व ब्राह्म तत्त्वज्ञान यांचा झगडा होऊन हिंदुस्थानमध्ये राजकीय भेद झाला त्याच वेळी इस्लाम धर्माच्या राजकीय सामथ्र्याचा कळस झाला होता. “हर्षवर्धन राजा सातव्या शतकाच्या मध्यास निवर्तला. इस्लामचा विकास व हिंदी राजकीय अवनति हीं एकसमयावच्छेदंच चालली होती. कोठल्याही मोठ्या राजाच्या मृत्यूनेच कांहीं इतिहासांत घडामोडी होत नाहींत. अवनति किती तरी शतकें आधी चालू असते. बुद्ध क्रांतीमुळे ती थोपवून धरली गेली होती. मात्र बुद्धक्रांति अयशस्वी झाल्यावर दुप्पट दौडीने अधोगति होऊ लागली. अप्रबुद्ध संन्याशांच्या अधःपाताने हिंदु साम्राज्याच्या अधःपातास मदत झाली व त्यामुळेच मुसलमानांचा विजय सुलभ झाला. मठांच्या अधःपाताने यूरोपांत तीच स्थिति झाली होती." मंदिरावरील श्रद्धा भंगली| महंमद गझनीच्या हल्ल्याबद्दल वेलचे म्हणणे असे की, " त्याला मिळालेल्या अप्रतिहत विजयाने त्याचे वजन अतिशय वाढले व सरहद्दीवरील असंस्कृत वर्गापैकी ज्यांना युद्ध म्हणजेच धर्म वाटे असे अनेक लोक इस्लाम-धर्मानुयायी बनले. त्यांना रणांतील विजयानेच स्फूति मिळत असे. महंमदाने केलेल्या लुटीमुळे मंदिर दिव्य व अधृष्य आहे या श्रद्धेला जोराचा धक्का बसला. या मंदिरांत अनंत काळापासून हिंदी लोक आपले उपाहार आणीत असत; आणि म्हणून ज्या धार्मिक भावनेने मंदिरांत पूजाअर्चा चाले त्या भावनेला व देवाच्या जागतेपणाबद्दल जी श्रद्धा असे त्या श्रद्धेला अत्यंत जोराचा धक्का बसला. अशा परिस्थितींत धार्मिक भावना व आध्यात्मिक अंतरावेग १०३