पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य । इतकेच नव्हे तर पूर्वीची राज्यव्यवस्था चालू ठेवण्यासाठी त्यांचीच योजना केली. " --एलिअट : हिंदुस्थानचा इतिहास विस्कळित समाज ज्या अर्थी कांहीं ब्राह्मणही म्लेंच्छांच्या बाजूस जावयास तयार झाले त्या अर्थी एकंदरीत समाजस्थिति सुस्थितीत नव्हती असेच म्हणावयास पाहिजे. समाजाची घडी इतकी विस्कळित व गोंधळाची असला पाहिजे की, त्यांतील वरिष्ठ वर्गाची सुस्थितीही निश्चित नसावा, असेच म्हणावे लागते. अशी स्थिति नेहमी प्रतिक्रांति यशस्वी झाली म्हणजे होत असले. क्रांति अनेक कारणांनीं अयशस्वी होऊ शकते, म्हणून ज्या प्रतिगामी पक्षाचा जय होतो तो पक्ष समाज घटना विस्कळित होण्याची कारणे दूर करू शकत नाहीं. बुद्धका अयशस्वी होण्यास बुद्ध तत्त्वज्ञानांतील अंगभूत दोषच कारणीभूत आहेत. वस्तुतः ती अयशस्वी झालीच नाहीं, ती भलत्याच वा मिळाली एवढेच. क्रांतीचा विजय होण्यास अवश्य इतकी परास्या पिकली नव्हती. बुद्धाच्या पराभवानंतर देशाची स्थिति आव" वाईट झाली. आथिक दुरवस्था, राजकीय जलूम, बौद्धिक बबदाe" (Intellectual Anarchy) व आध्यात्मिक गोंधळ यांनीं सारा देश बजबजाटन गेला होता. सर्व समाज विनाश व विघटना या चक्रांत सांपडला होता; आणि म्हणूनच दलित जनता सामा समता व राजकीय स्वातंत्र्य यांचे आश्वासन देणा-या इस्ला" धर्माच्या झेंड्याखाली गोळा झाली. जनता आली इतकेच नव्ह स्वार्थाध बनून वरिष्ठ वर्गही आपली सेवा खाविंदचरणारविदा करण्यास सज्ज झाला. याचा अर्थ एवढाच कीं, कनिष्ठ निराशाग्रस्त होते व वरिष्ठ वर्ग पतित झाले होते. १००