पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें इस्लाम व हिंदुस्थान हिंदुस्थानांत मुसलमानी धर्माचा प्रवेश झाला त्या वेळी त्याची प्रगतिपरता निमालीच होती. विद्वान् व सुसंस्कृत अरबांचे नेतृत्व त्या वेळी नव्हते; परंतु, क्रांतीची तत्त्वे अद्याप मुसलमानी धर्माच्या निशाणावर झळकत होती. शिवाय इराण आणि इतर ख्रिस्ती प्रदेशांची जी स्थिति होती, तीच स्थिति मुसलमानांनीं हिंदुस्थान जिंकण्याचे वेळीं हिंदुस्थानची होती. जितांपैकी बहुसंख्य जनतेचा सक्रिय पाठिंबा नसेना का; परंतु सहानुभूति मिळविल्याशिवाय जेत्यांच्या आहारी कोठलेही महान् लोक जाणे शक्य नाहीं. सनातनी पुरोहित वर्गाने ( Brahmanical Orthodoxy ) क्रांतिकारक बुद्धिवादावर वर्चस्व मिळविले होते. अकराव्या व बाराव्या शतकांत अधार्मिक म्हणून दडपशाहीने त्रस्त झालेले लोक तेथे पुष्कळच होते; आणि त्यांना इस्लामचा संदेश आदरणीय वाटला असेल यांत शंका नाहीं. शैतकन्यांवरील जुलूम-- जाट व इतर दलित शेतकरी यांचे साहाय्याने महंमद इब्न कासीमने सिंध जिंकला. तेथील शेतक-यांवर त्या वेळच्या पुरोहितवर्गाची अनियंत्रित सत्ता व जुलूम चालू असे. सिंध जिंकल्यावर त्याने अरब लोकांचे धोरण अंमलांत आणले. " ब्राह्मण सत्ताधारी वर्गाला विश्वासात घेऊन देशांत शांतता प्रस्थापित करण्याचे काम त्याने त्यांना दिले. त्याने त्यांना देवळे सुस्थितीत ठेवण्याची परवानगी दिली. आपल्या धर्माप्रमाणे वागण्यास हरकत केली नाहीं. वसूल त्यांचेच हातीं ठेवला. ९९