इस्लामी तत्त्वज्ञान पडली. बुद्धिवाद हा अधार्मिकपणा मानला जाऊ लागला. अव्हेरोज व अॅरिस्टॉटल यांची नांवें बहिष्कृत झाली. कालांतराने प्रतिक्रांतीचा इतका विजय झाला की, तत्त्वज्ञान म्हणजे अधर्म, अश्रद्धा व अनीति असे सनातनी भुसलमान मानू लागले. परंतु प्रगतीचे निशाण कांहीं खाली पडण्यासाठी वर चढविले गेले नव्हते. निरर्थक धार्मिक दंभ व क्षोभ आणि असहिष्णुत्व वा जुलूम मग तो ख्रिस्ती वा मुसलमान असो तो कांहीं अशा रीतीने स्वातंत्र्याच्या सूर्याला झाकोळू शकत नाहीं. अव्हेरोज अरबांना पारखा झाला परंतु भवितव्याचे मानकरी असणा-या लोकांनी त्याला मानाच्या सिंहासनावरच चढविलें. सनातन धर्माचे आसन बाराव्या शतकापासून पुढे ज्या झगड्याने गदगदा हालविले, असा बुद्धि आणि श्रद्धा(?), जुलुमी अज्ञान आणि प्रभावी स्वातंत्र्य यांचा तीव्र झगडा अव्हेरोज या अरब तत्त्वज्ञान्याच्या स्फूर्तीतूनच निघाला होता. अव्हेरोजच्या तत्त्वज्ञानाचा यूरोपच्या शास्त्रीय विचारावर चार शतकें प्रभाव होता. ९७
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/93
Appearance