Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य इतिहासाचे पान उलटले जात होते, अशा वेळीं तो होऊन गेला. बाराव्या शतकाचे सुमारास संस्कृति कळसास पोहोंचून प्रतिक्रियेची बीजे रुजू लागलों होती. त्यामुळे प्रगतीचीं पाउले मंदावली होती; हास तर सुरू झालाच होता. अवताराची समाप्ति अरव धर्माने दिलेल्या स्वातंत्र्याने इतकी उंच भरारी मारली होती की, “ धर्मसंरक्षकांचे ऐहिक हितसंबंध त्या पांचशे वर्षांतच विचारस्वातंत्र्याला संपूर्णपणे विरोधी झाले होते. इस्लामचे तत्त्वज्ञान इतक्या विस्मयावह रीतीने विकसित झाले. अव्हेरोजने ' बुद्धिरेक सत्यानृतस्य प्रतिष्ठा' असा क्रांतिकारक सिद्धांत मांडला, म्हणूनच पुरोहितांच्या वजनामुळेच असे अधार्मिक सिद्धांत मांडणारा नरकाप्रत जाईल असा फतवा कॉरडोव्हचा सुलतान मासूर यास काढावा लागला आणि या इस्लामच्या उदात्त शिकवणीच्या निषेधापासून मानवी प्रगतीचे साधन असलेला तो धर्म अज्ञान, प्रतिक्रिया, पूर्वग्रह छ असहिष्णुत्व यांच्या प्रसाराचे साधन बनला ! या वेळी इस्लामचे ऐतिहासिक कार्य संपले होते. त्याचे कार्य {Mission) प्राचीन संस्कृतीची संपत्ति दोन साम्राज्यांच्या हासांतून व दोन धर्माच्या अंधारांतून वाचविणे हेच होते. आणि ते कार्य झाल्यावर स्वतःच स्वतःला विसरावे-छे, आत्मवंचना करावी तशी त्यांची गत झाली. आणि तेथून पुढे तो तुर्की रानटीपणा व मोंगलाचा लुटारूपणा यांचे निशाण हातीं मिरवू लागला. प्रतिक्रांतीची छाया इस्लाम स्वतःचीच ओळख विसरला. अॅव्हेरोजला कारडोव्हचे दरबारांतून-विचारस्वातंत्र्याच्या मंदिरांतून-घालवून देण्यांत आले. त्याच्या अमूल्य पुस्तकांची धार्मिक प्रतिक्रियेच्या अग्नीमध्ये आहुति