पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी तत्त्वज्ञान गेलेल्या, गझलीचे ऐतिहासिक महत्त्व तात्काल स्पष्टपणे पटते. पण गझली काळाच्या पुढे होता. प्रायोगिक शास्त्रपद्धति त्याचे वेळीं शक्य नव्हती. साधनांच्या अपुरेपणामुळे पदार्थाचे रूप अगदी अचूक ठरवितां येत नसे. आणि या निराशेने गझली शेवटीं गूढवादी झाला. पण त्याचे हे वर्तन कॅटच्या वर्तनापेक्षा अधिक विचार करण्यासारखे आहे असे नाहीं. वस्तुगत अडचणीमुळे त्याच्या विचासरणीचीं पंखें छाटली गेली, पण स्वतःचे वर्गाबद्दल असलेल्या पक्षपातामुळे कॅटची प्रतिभा निष्प्रभ झाली. वायवलांतील विचारांचे खंडन आकाशांतील तान्यांच्या स्थितीबद्दलचे टॉलमीचे सिद्धांत अमान्य करणारा अबूबकर हा पहिलाच ज्योतिषशास्त्रज्ञ होय. तो बाराव्या शतकांत होऊन गेला. ग्रहस्थिति व ग्रहगति यांसंबंधी त्याने स्वतःची विचारप्रणाली बसविली होती. ती पुढे गीआरडॅनो, ब्रूनो, गॅलिलीओ व कोपर्निकस यांना मार्गदर्शक झाली. या सरणींत सर्व गती ताडून पाहून एकही चूक न आढळल्याचा उल्लेख आहे. स्वतःची विचारसरणी पूर्णपणे सिद्ध होण्यापूर्वीच त्याला मत्यवश व्हावे लागले. सर्व ग्रहगोल नियमाने फिरतात हा त्याचा सिद्धांत त्याचा शिष्य फेत्राजिअस याने लोकांना पटवून दिला. ज्योतिषशास्त्रांत त्याची तत्त्वसरणी मध्ययुगांत फारच मानली जात असे. बायबलचे विश्वोत्पत्तीसंबंधींचे विवेचन विपरीत करून टाक. णारी ही सरणी मठामठांतून शिरली. रॉजर बेकन व त्याचा प्रतिस्पर्धी अल्बर्ट मॅग्नस या दोघांनीही अल् फेत्रिजाअसचे ज्योतिषशास्त्रांतील ऋण मान्य केले आहे. फेत्राजिअसने अबूबकरच्या सरणीचे विवेचन करून दाखविले आहे. अव्हेरोज या श्रेष्ठ व सर्वात आधुनिक तत्त्वज्ञाची भूमिका व । विचारसरणी मागे विशद करून दाखविली आहेच. इस्लामी संस्कृतीच्या ९५