पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य इ मी काठीचा साप करतो असे सांगितले आणि त्याप्रमाणे चमत्कार करून दाखविला तरी तो चूक आहे ही माझी खात्री अढळ राहिली पाहिजे. त्याच्या चमत्काराने फार तर त्याच्याबद्दल कौतुक वाटावे, पण मला माझ्या ज्ञानाचा संशय कधीं येऊ नये. अगदी अचूक ज्ञानाबद्दल सुमारे हजार वर्षांपूर्वी मुसलमान तत्त्वज्ञान्यांनी जे लिहून ठेविलें आहे ते अद्यापि खरे आहे. ही शास्त्रीय वृत्ति आम्हां हिंदी लोकांत अगदीच कमी आहे. अगदी चालू विसाव्या शतकांतही ते चमत्कार, जादू व आध्यात्मिक ढोंगे यांनी भारावून जातात व या सर्वांमुळे ते शास्त्रीय सत्यही अविश्वसनीय मानू लागतात हे विशेष नव्हे का ? चिकित्सावादाचा जनक-- गझलीचे मत असे होते की ज्ञान हे अवलोकन व प्रयोग यावरून मिळविल्याशिवाय अचूक असणार नाही. तसेच सिद्ध केलेल्या नियमानींच अनुमाने काढली पाहिजेत. अवलोकन व कार्यकारणभाव यांच्या योगानेच जर ज्ञानसिद्धी झाली तरच त्यांत वरील उता-यांत म्हटल्याप्रमाणे संशयातीतता असते. इंद्रियाच्या अवलोकनाची दुरुस्ती फक्त बुद्धीनेच होऊ शकते. धर्माबद्दल दुरभिमान व असहिष्णुत्व असलेल्या वातावरणांत असे स्वतंत्र विचार पाहून ते सांगणान्याच्या धैर्याची तारीफच केली पाहिजे. तरी पण गझलीचें चिकित्सावादी तत्त्वज्ञान त्याचे काळांत सर्वत्र अभ्यासले जात असे. पौर्वात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारा फ्रेंच तत्त्वज्ञ रेनॉन याचे मत पाहण्यासारखे आहे. तो म्हणतो; * आधुनिक चिकित्सावादाचा जनक ह्यूम याने देखील अल् गझलीपेक्षा विशेष अधिक कांहींच सांगितले नाहीं. निव्वळ अनुमानाने विचार करण्याचे पद्धतीच्या मुळावर घाव घालणारी कॅटची विचारसरणी ह्यूमच्या चिकित्सावादांतूनच स्फुरली होती, हे ध्यानीं घेतले म्हणजे ह्यूमच्या पूर्वी ७०० वर्षे होऊन ९४