पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी तत्त्वज्ञान नेत्रविद्येत प्रगति-- अकराव्या शतकांत अहसन नांवाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेला.. कोठल्याही युगाच्या श्रेष्ठ शास्त्रज्ञांत त्याला स्थान मिळणे अवश्य आहे. नेत्रविद्येत त्याचा हातखंडा असे. ग्रीक लोकांपासून ती विद्या तो शिकला. पण मुळापेक्षा त्याने त्यांत प्रगतीच केली आणि डोळ्यांतून सूर्यकिरणे निघतात हा सिद्धांत चुकीचा आहे हे त्याने सिद्ध केले. शारीर व भूमिति या शास्त्रांच्या साह्याने दिसणाया पदार्थापासून किरणे पसरतात व डोळ्याच्या पडद्यावर त्याचे ठसे उमटतात हे त्याने सिद्ध केलें. अरब शास्त्रज्ञांपासून नेत्र व प्रकाशक्रिया यासंबंधींची मते केप्लरने घेतली असावीत याला पुष्कळच आधार आहे. सत्याचा शोध अंदालुसियाच्या व्यापा-याचा मुलगा अल् गझली हा ह्या शतकां-- तच होऊन गेला. सत्य म्हणजे आत्मअवधान हे त्याने डेस्कटस्च्या आधी सांगितले. प्राचीन व अर्वाचीन संशयवादांतील तो एक दुवाच आहे. त्याने तत्त्वज्ञानांत घातलेली संस्मरणीय भर त्याचेच शब्दांत अशी आहे : * धर्मापासून समाधान मिळणे अशक्य आहे असे ठरल्यावर मी सर्व प्रमाण म्हणून जे होते ते सर्व सोडून दिले. लहानपणापासून अचिकित्सेच्या काळांत ज्या मतांचा संस्कार माझेवर घडत आला होता त्याचेपासून मी अलिप्त राहिलो. माझे ध्येय वस्तूंचे-पदार्थाचे सत्य ज्ञान करून घेणे हे आहे आणि म्हणून ज्ञान म्हणजे काय हे ठरविणे अपरिहार्य आहे. विचारांती हे स्पष्ट झालें कीं कांहीं ज्ञान निदान असे हवे की, ज्यायोगे पदार्थांचे विवरण संशयातीत झाले पाहिजे आणि त्यामुळे पुढे अनुमान अशक्य व्हावे. उदाहरणार्थ मला एकदां दहा हे तिनीपेक्षा अधिक आहेत हे पटले की मग एकाद्याने तीनच मोठे आहेत व त्यासाठी ९३