पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य 'रास त्याने स्वतःला अग्निसात् केले. तत्त्वज्ञानाचा अभ्यास गणितावर आधारला पाहिजे, तो निव्वळ काल्पनिक अनुमान असू नये. अमूर्त विचारांस तर्कशुद्ध विचारांचे पाठबळ असावे आणि त्याला आधार मूर्त सिद्धांत, नियम व उदाहरणे यांचा असावा म्हणजेच योग्य अनुमाने काढतां येतात. या नियमांनी अभ्यास व विचार करावा, असे सांगणारा हा तत्त्वज्ञ बेकन व डेकॉटिस यांच्यापूर्वी सात शतके होऊन गेला हे अरब संस्कृतीला किती गौरवाचे आहे ! एक हजार वर्षांपूर्वी अरब तत्त्वज्ञान्याने केलेला उपदेश आजही पुष्कळ तत्त्वज्ञान्यांना लाभदायक झाल्याशिवाय राहणार नाहीं.. अल् फराबी हा दहाव्या शतकांत होऊन गेला. दमास्कस शाणि बगदाद या दोन ठिकाणीं तो शिकवीत असे. अॅरिस्टॉलवर लिहिलेले त्याचे टीकाग्रंथ पुष्कळ शतकेंपर्यंत प्रमाण मानले जात असत. वैद्यक शास्त्रांतही तो अत्यंत प्रवीण होता. रॉजर बेकन हा त्याच्या‘पासून गणितशास्त्र शिकला. वैद्यक-विशारद दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात अविसेना होऊन गेला. बुखान्याच्या -संपन्न व्यापारी कुलांत त्याचा जन्म झाला होता. त्याने गणित व पदार्थविज्ञान शास्त्र यावर पुष्कळ लिहिले आहे. परंतु वैद्यकावरील त्याच्या ग्रंथामुळे तो इतिहासांत नामवंत झाला आहे. सालेर्मोची वैद्यक शाळा हे त्याचे स्मारक होय. आणि त्याचा ग्रंथ सोळाव्या शतकापर्यंत यूरोपमध्ये प्रमाण मानला जात होता. या प्रसिद्ध वैद्यकविशारदाचे तत्त्वज्ञानावरील विचार इतके नवीन व क्रांतिकारक होते की, बुखान्याच्या स्वतंत्रप्रज्ञ अमीरासही अविसेनाच्या अधार्मिक शिकवणीप्रमाणे वागणा-या इसमांचे वर्चस्व कमी करतां आलें नाहीं. त्याला दरबार सोडून सर्व अरब साम्राज्यांत वैद्यकशास्त्र व आपले स्वतंत्र तत्त्वज्ञान शिकवीत हिंडावे लागेल. ९२