इस्लामी तत्त्वज्ञान अॅव्हेरोजचे स्थान त्याला परत मिळाले व त्याच्या पुस्तकावरील बहिष्कार टळला. परंतु लॅटिन भाषांतरांतून वरचा व त्याच्यासारखे असलेले उतारे वगळण्यांत आले. तरीसुद्धा १२, १३ व १४ व्या शतकांतील धर्मविरोधकांची चळवळ ही त्याच्या शिकवणीच्या स्फूर्तीमुळेच चालू होती. मध्ययुगांत कॅथॉलिकांच्या प्रभावामुळे सर्व यूरोप आध्यात्मिक दास्यांत होता. या कॅथॉलिकांच्या वर्चस्वाला जोराची ठोकर धर्मविरोधी चळवळीमुळेच मिळाली. बाराव्या शतकापासून तों आधुनिक शिक्षणाचा खरा विजय होईपर्यंत खिश्चनांच्या दृष्टीने अॅव्हेरोजचे तत्त्वज्ञान आणि धर्मविरोध हीं एकच होती. आणि ते तसे सहजच होते. कारण वर उद्धृत केलेला एकच उतारा अरब लोकांना उत्सुकतेने विज्ञानप्रवण करण्यास पुरेसा होता असे दाखविण्यास भरपूर आधार आहे. विज्ञानामुळे अज्ञानवापी झांकून टाकतां येते; श्रद्धेला पावित्र्य लाभते; आणि धर्मसिद्धांतानुरूपही विज्ञानाचा गौरव करतां येतो हीच या उता-याची फलश्रुति होय. परमेश्वराचे आकलन या उतायांत अॅव्हेरोजने तर्कशास्त्राची मूलतत्त्वे सांगितली आहेत. विश्वाचा कोणी उत्पत्तिकर्ता आहे ही कल्पना किंचित् बाजूला ठेवून त्याचे ज्ञान व्हावे असा प्रयत्न त्याने केला, परमेश्वरी सृष्टीच्या, म्हणजेच ‘निसर्गाच्या सत्यज्ञानाच्या मागे आपण लागलों कीं, दिव्य ‘सत्' असतांच विलीन होते आणि त्याचे अस्तित्व सिद्ध करण्याचा " न इति" एवढा एकच मार्ग राहतो. परमेश्वराचे आकलनासाठी अशा मार्गाने चाललेल्या प्रयत्नास ज्या धर्मानें प्रोत्साहन दिलें तो धर्म मानवी ‘विचारसरणींत अत्यंत प्रगत असल्याचेच प्रतीक आहे. आधुनिक मोठ्या धर्मापैकीं, मुसलमान धर्म हा श्रेष्ठ होय. त्याने इतर सर्व धर्माचा आधारच नष्टप्राय केला आणि इस्लाम धर्माचे ऐतिहासिक महत्त्व वें हेंच होय. ८९
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/85
Appearance