पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य व्यापक तत्वज्ञान इजिप्त, असीरिया ज्यू, इराण व ग्रीक या लोकांच्या संस्कृतींचा जेथे उदय, हास व विनाश झाला तेथेच इस्लामी व अरबी संस्कृतीचे केंद्र होते. त्या जुन्या संस्कृतीचा जो परिणाम झाला तोच अरब संस्कृतीचा आधार व एकच परमेश्वराची कल्पना हेच नवीन धर्माचे मुख्य तत्त्व. सर्व धर्माचा आधार एकच आहे या कल्पनेला प्रारंभीं जन्म दिल्याचे श्रेय अरब तत्त्वज्ञानाला दिले पाहिजे. जीव व जगत् यासंबंधींचे गूढ सोडविण्याचा मानवी प्रयत्न म्हणजे धर्म होय असे व्यापक तत्त्व अरब तत्त्वज्ञान्यांचे होते, एवढेच नव्हे तर सदर प्रयत्न जितका बुद्धिगम्य करता येईल तितका तो मोठा, उदात्त व पवित्र होय. धर्मासंबंधींची बौद्धिक विचारसरणी ही अॅव्हेरोजच्या मनांत स्पष्ट होती. अथेन्स व अलेक्झेंड्रिया येथील महर्षीच्या गूढ व शास्त्रीय ज्ञानाच्या बरोबरीनेच स्वतंत्र विचारसरणीच्या योगाने मानवी संस्कृतीत भर टाकली आहे. संशय, चिकित्सा यामुळेच श्रद्धा दृढ होते. ज्या वेळी बुद्धि अंधश्रद्धेला आव्हान देते त्या वेळीं मानवी प्रगतीच्या मार्गावर नवाच प्रकाश पडतो. युरोपमधील संशयवादाच्या इतिहासांत 'तीन तोतये' या अनामिक पुस्तकास फार महत्त्वाचे स्थान आहे. या दुष्ट पुस्तकाचे कर्तृत्व ख्रिस्ती बादशाह फ्रेड्रिक बार्बारोसा अगर मुसलमानांचा तत्त्ववेत्ता अॅव्हेरोज यांचेवरच लादलें जाते. येशू व महंमद हे तोतये ! एक लेखक ख्रिस्ती व दुसरा मुसलमान ! अरेरे ! धर्माला मोठे वाईट दिवस आले होते ते ! सधं धमचे ऐक्य तेराव्या शतकापूर्वी संशयवाद होता, परंतु अंधविश्वास अल्प होता. एकादे तत्त्व विवाद्य असो कीं अमान्य झालेले असो, परंतु ख्रिस्ती धर्माच्या पायाला कधीच धक्का पोहोंचला नव्हता. सर्व धर्माना सामान्य ९०