Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य करणाची साधने त्यांनीच शोधून काढली. घन, द्रव आणि वायुरूप पदार्थांची छाननी प्रथम त्यांनी केली. अल्कली आणि आम्ल यांच्यांतील साम्यभेदाचे प्रयोगही त्यांनीच केले, आणि अनेक खनिज पदार्थांचे गुणकारी औषधांत रूपांतरही त्यांनीच केलें. | वैद्यकाच्या शास्त्रांतच अरबांनी सर्वात मोठी प्रगति केली. गॅलेन या सद्गुरूच्या दोन सच्छिष्यांनी या शास्त्राचा विकास पुष्कळच केला. बुखाच्यासारख्या दूरच्या ठिकाणी राहणारा अविसेना याला सुमारे ५०० वर्षांपर्यंत या शास्त्रांतील प्रमाण मानीत असत. सॅलेर्मोच्या वैद्यकीय पाठशाळेत सुमारे सोळाव्या शतकापर्यंत पुष्कळ विद्यार्थी शिक्षण घेत असत. तेथे अरबांच्यामुळेच शाळेला प्रारंभ झाला; आणि अविसेनाचे पाठच तेथे अभ्यासले जात असत. रोकडे ज्ञान अवलोकनाने ज्ञान मिळविणे हे अरबांचे वैशिष्ट्य होय. उगीच हवेत तर्क करण्याचा अभिमान सोडून देऊन ज्ञात वस्तूंच्या भूमीवर ते स्थिर उभे असत. डॉयिन अॅव्हेरोजच्या मतांत अरब विद्येचे वैशिष्ट्य दिसून येणार आहे. “जे आहे त्याचा अभ्यास करणे हाच तत्त्वज्ञान्यांचा धर्म. परमेश्वरी कार्याचे ज्ञान व तदनुरोधाने होणारे त्याच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान हीच खरी परमेश्वरसेवा. त्याच्या दृष्टीने हाच खरा कर्मयोग. उलट अशा त-हेनें उपासना करून सर्वश्रेष्ठ धर्माचा जे आश्रय करतात त्यांच्यावर चुकीचे व वितंडवादी म्हणून कर लादणे ही अत्यंत हीन क्रिया होय.' असल्या धर्मविरुद्ध विचारांचा प्रसार ज्या धर्मात अगदी धार्मिक परिभाषेत चालत असे तो असहिष्णु व दुरभिमानी कसा म्हणावयाचा ? असल्या या मतामुळे पुरोहित वर्गाचा रोष या तत्त्वज्ञान्यांवर झालाच, आणि विशेष हें कीं, मुसलमान पुरोहितांपेक्षा ख्रिश्चन पाद्रीच अधिक रुष्ट झाले. थोड्याशा हद्दपारीनंतर अंदालुसिआच्या सुलतानच्या दरबारांतलें