इस्लामी तत्त्वज्ञान शास्त्रांचा प्रसार जुन्या ग्रीक महर्षीचे ग्रंथ गोळा करून त्यांनी त्यांचे नुसते संरक्षणच केलें नाहीं तर त्यांच्यावर टीका करून त्यांच्यांत सुधारणा घडवून आणल्या. प्लेटो, अॅरिस्टॉट्लू, युक्लिड, अपोलोनिअस व टॉलेमी यांचे समग्र ग्रंथ, त्यांचेवरील ' विषमपद विमषिणी' टीकेसहित, नव्या यूरोपच्या जनकांना प्रथम अरबी भाषेतूनच वाचावयास मिळाले. मनुष्यांची दृष्टि व्यापक करणारे व निसर्गाच्या नियमांशी ओळख करून देणा-या खगोलशास्त्राचीं अरबांनी अत्यंत कळकळीने जोपासना केली. अवलोकनाच्या नव्या साधनांनीं पृथ्वीचा व्यास व स्थिति इतर अनेक ग्रहांच्या स्थितिगतीसह अगदी बरोबर जाणली. खगोलशास्त्राचे मूळचे स्वरूप अरबांनी अगदीं पालटून टाकले. पौर्वात्य पुरोहितांनी फलज्योतिषाप्रमाणे त्याचा विकास केला व अरबांनी त्याचे अगदी बरोबर असे शास्त्र बनविलें. अलेक्झेंड्रियाचे डायेफॅटसने बीज गणिताचा शोध लावला; परंतु अरबांच्या काळापर्यंत त्याचा अभ्यास असा होत नव्हता, किंबहुना शास्त्र या पदवीला ते अरबांच्या वेळीच पोहोंचल्यामुळे त्याचा मूळ शोध अरबांनींच लावला अशी खात्री आहे. परंतु अरबांनीं विनम्रपणे आपलें ग्रीक ऋण कबूल केले आहे. अरबांची ज्ञानोपासना-- | वनस्पतिशास्त्राचा अभ्यास औषधीय उपयोगासाठी केला जात असे; तरी डायोस्कोराइड्सने लावलेल्या दोन हजार वनस्पतींच्या शोधाने त्या शास्त्राचा पाया घातला. रसायनशास्त्र हे अगदी गुप्त असे. इजिप्तच्या भिक्षुनीं त्याचे आस्थेने संरक्षण केले होते. बेबीलोनमध्येही त्याचा उपयोग केला जात असे. हिंदुस्थानमध्येही रसायनशास्त्राची मूलतत्त्वें अवगत होती असे दिसते, परंतु रसायनशास्त्राचा प्रारंभ व विकास हा अरबांच्याच प्रयत्नाने झाला. बाष्पी ८७
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/83
Appearance