या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
इ इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य होता. या वेळी पांचवें शतक सुरू झाले होते. अलेक्झेंड्रियाच्या सुसंस्कृत जनतेने एका नास्तिक स्त्रीची तत्त्वज्ञान व गणित या विषयांवरील व्याख्यानें-प्रवचने आदराने ऐकावीत हे या खिस्ती संतांना खपलें नाहीं. (तुकारामाचा उपदेश तरी राम शास्त्र्याला कोठे खपला ?) खरे असे होई कीं, गूढ व अगम्य अशा त्याच्या पुराणांना फक्त डाकू लोकच येत. आपण बौद्धिक दृष्ट्या न टिकू, पण आपण व्यवहाराने वागून स्पर्धेचा कांटाच वाटेतून दूर करू असे त्यांना वाटे; आणि त्यांच्या चिथावणीमुळेच भिक्षूच्या सैन्यासह बंडखोरांनीं अलेक्झंड़ियावर हल्ला केला व जीं लिहितां येत नाहीत, इतकेच नव्हे तर ज्यांच्या स्मरणानेही शरम वाटावी, अशीं भयंकर कृत्ये त्यांनी केलीं !
- अशा त-हेने ४१४ व्या सनांत जगांतील श्रेष्ठ बौद्धिक नगरांत तत्त्वज्ञानाचा दर्जा ठरून गेला; यापुढे शास्त्रीय ज्ञानाची किंमत कमी होऊन ते अंधारांत पडले पाहिजे ! त्याचे सार्वजनिक अस्तित्व अशक्य झाले पाहिजे. ग्रीक तत्त्वज्ञानाची पोलादी तरवार दुरभिमानाच्या गदेने बोथट करून टाकली होती. रोममध्ये विचारस्वातंत्र्य असता कामा नये, हे नक्की झाले होते. जेत्यांची सत्ता टिकून होती तोपर्यंत वरील गोष्ट ठीक होती. पण अरबी टोळ्यांनी अलेक्झंड़िया जिंकल्यावर सदर घोषणा लागू करणे अशक्य होते. ........ कारण, पुढील दोन शतकें कंटाळवाणीं व दुःखदायकच गेली. परंतु परस्थ लोकांनी येऊन जुलूम व दडपशाही नष्ट केली. अरब जेत्यांनी आपले असिधारा व्रत चालविलें हें ठीक झाले. त्यांनी अतिमानुष ज्ञान असल्याचे ढोंग कधीच केलें नाहीं. धर्मशास्त्राच्या विरोधाभासाच्या जंजाळांत न अडकतां ज्ञानाची उपासना करण्यास ते स्वतंत्र होते. इजिप्तला अरबांनीं भयंकर धर्मवेड, अज्ञान व रानटीपणा यांच्या मगरमिठींतून सोडवून पूर्वीच्या कीर्तवैभवाच्या पदी नेऊन बसविले.
-डेपर : यूरोपच्या बौद्धिक विकासाचा इतिहास ८६