इस्लामी तत्त्वज्ञान बहिष्कृत शास्त्र्यांना आश्रय मिळाला. त्यांची विद्वत्ता पाहून खलिफा इतके ( थक्क ) खूष झाले की, या काफिरांना कुराण अगर मृत्यु यांपैकी कशाचीच निवड करावी लागली नाही. उलट सर्व धर्मापहासकांना आतिथ्यस्वीकाराचे निमंत्रण देण्यांत आले. ग्रीक ज्ञानाचा संग्रह खलिफा या विद्वानांना संरक्षण देऊनच थांबले नाहींत; ग्रीसमधील महर्षीचे मिळतील तेवढे ग्रंथ आणण्यासाठी योग्य माणसांना त्यांनी पाठविलें व अॅरिस्टॉट्ल, हिप्पारकस, हॉयपोक्रेटस, गेलन इत्यादिकांच्या प्रसिद्ध ग्रंथांचीं अरबी भाषेत भाषांतरें करविलीं. मुसलमानी प्रदेशांत खलिफांनीं धर्मविरोधी तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यास प्रोत्साहन दिले. सरकारी खर्चातून चालू असलेल्या शाळांतून हजारों रंकराव विद्याथ्र्यांना शास्त्रीय ज्ञानाची दीक्षा देण्यात येत असे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत मिळे. शिक्षकांना आपल्या कामाबद्दल मान व मोबदला भरपूर मिळे. विद्वानांबद्दल अल् मॅनॉन् खलिफाला काय वाटे याचे वर्णन इतिहासकार अबूल फरागिअस याने खालीलप्रमाणे केले आहे : * बौद्धिक विकासाला ज्यांनीं वाहून घेतले तेच खरे परमेश्वराचे भक्त, उपासक व सेवक होत. जे शहाणे करून सोडितात तेच खरे तारे होत. ते नसतील तर जग फिरून अज्ञान तमावस्थेत बुडून जाईल." महंमदाच्या अनुयायांनीं आश्रय दिलेले बरेच विद्वान् अधार्मिक होते. पुष्कळ वाचकांना मुसलमानामध्ये धर्मवेड व दुरभिमान नव्हता हें। यामुळे कळेल व खोट्या कल्पनांचा निरास होईल तर फार बरें ! बहुतेक सर्व विद्वानांचे, बुद्धीनेच सत्याची पारख करावी याबद्दल एकमत होते. खलिफाप्रमाणे बुद्धिवादाचा विकास करावा असा आदेश देणारा धर्माधिकारी इतिहासांत विरळाच. कारण, बुद्धिविकास हा धर्मविकासाच्या नेहमीच आड येत असतो; परंतु खलिफा अल् मॅनॉन् हा आबासादीच्या प्रसिद्ध वंशांतील होय. ते सर्व विज्ञानाचे अभ्यासू होते. ८३
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/79
Appearance