पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य ग्रीक विद्यांचा वारसा मिळाला. आधुनिक शास्त्रसंशोधनाचा आद्य पुरस्कर्ता सर रॉजर बेकन हा अरबांचा शिष्य होता. ह्यूम वोल्टच्या मते अरब लोकच नव्या भौतिक शास्त्राचे संस्थापक होत. त्यांनी प्रयोग आणि गणना या दोन मोठ्या साधनांनी प्रगतीचा मार्ग तयार केला; व त्यांमुळेच ते नव्या व जुन्या शास्त्रांमधील दुवा झाले आहेत. । | अल्-कंदी, अल्सन, अलफराबी, अविसेना, अल्-गझली, अबूबकर, अवेम्पेस्, अलफेत्राजिअस हीं नांवें मानवी संस्कृतीच्या इतिहासांत संस्मरणीय आहेत. अॅव्हेरोजची कीत त्याने अॅरिस्टॉलची ओळख नव्या संस्कृतीला करून दिली म्हणून अमर झाली आहे. अॅरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान प्रसृत झाले म्हणून यूरोपमध्ये धार्मिक दुरभिमान व निरर्थक विद्वत्ता यांचेविरुद्ध चालू असलेला झगडा जोरात चालविण्यास स्फूति मिळाली. अन्दालुशियाच्या या सुलतानाच्या आश्रयाखालील युगप्रवर्तक बुद्धिवादी अॅव्हेरोजचे कार्य राजर बेकननें खालील अवतरणांत उत्कृष्ट रीतीने मांडले आहे. अॅरिस्टॉट्लने निसर्गाची ओळख जनतेला करून दिली तर अॅव्हेरोजने प्रत्यक्ष अॅरिस्टॉटलचीच ओळख करून दिली. ' ख्रिश्चन धर्माच्या प्रामाण्याविरुद्ध बंडाचे निशाण तेराव्या चौदाव्या शतकांत उभारले होते. बुद्धिवादी क्रांतिकारकांना अॅव्हेरोजने शिकविलेल्या ग्रीक तत्त्वज्ञान्यांच्या शिकवणीपासून या बंडाची स्फूत झाली. ग्रीक विद्वानांचे स्वागत जस्टिनिअनच्या दुरभिमानामुळे ख्रिस्ती राजवटींतून ग्रीक तत्त्वज्ञानाचे अवशेष साफ धुऊन टाकले; ग्रीक विद्वानांना आपली स्थाने सोडून द्यावी लागली. रोमन साम्राज्यांतून बाहेर जाऊन त्यांना इराणांत राहावे लागले. त्यांच्या अभ्यासांना तेथील स्वधर्मसत्ता ही तितकीच विरोधी ठरली. शेवटीं आबासादीसच्या दरबारांत या ८२