पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य ज्ञानाचे कैवारी, वैरी नव्हे आफ्रिका व स्पेन येथील सत्ताधारी, राजकीय सत्ता, ऐहिक वैभव, व ज्ञान यांचा प्रचार व परामर्ष कोण अधिक करतो या बाबतींत परस्परांशी स्पर्धा करीत असत. कैरोच्या ग्रंथालयांत शतसहस्रांहून अधिक ग्रंथ होते, तर कॉरडॉव्हच्या ग्रंथशाळेचा अभिमान याहून सहापट मोठा होता. यावरून अरवांनीं अलेक्झेंड्रियाचे ग्रंथभांडार नष्ट केले ही गोष्ट विश्वसनीय वाटत नाहीं. कदाचित् त्या गोष्टीच्या मुळाशीं मुसलमानांचा हट्टीपणा अगर धर्मवेडेपणा दाखविण्याचा हेतु असावा. अलेक्झेंड्रियाचे ग्रंथभांडार * अग्नये स्वाहा' केलें असे मानावयाचे तर अंतःकरण अतिशय बावळट किंवा वाटेल त्याच्यावर विश्वास ठेवणारे असले पाहिजे; कारण, तसे असते तर मुसलमानांनी एवढी मोठी विद्यापीठे चालविलीच नसती किंवा रोमन वगैरे प्राचीन संस्कृतीचे धन त्यांनीं संरक्षिलेंही नसते. शास्त्रीय व निःपक्षपाती अभ्यासाने खोट्या कंड्या व दंतकथा यांचा निरास होतांच इतर धर्माप्रमाणेच मुसलमान धर्म हा मानव जातीचा शाप नसून मानव जातीला मिळालेला वरच होता असे सिद्ध होते. विद्यादहनाची दंतकथा अकराव्या व बाराव्या शतकांत या विस्मयकारक विद्यादहनाची हकीकत अगदी रसभरित व सविस्तरपणे लिहिलेली आढळते; परंतु युटिशिअस वे एलर्मोकिन या दोन्ही तत्कालीन इजिप्तमधील इतिहासकारांनी या गोष्टीचा उल्लेखही केला नाहीं. युटिशिअस हा तर अॅलेक्झेंड्रियाचा कुलपतिच होय. ख्रिश्चनांच्या शत्रूचा तो पक्षपात करील हैं संभवनीय नाहीं. हे भयंकर कृत्य ओमार खलिफाच्या एका हुकुमावरून त्याच्या सेनापतीने केले असे सिद्ध करण्यासाठी एक हुकूम नेहमीच पुढे केला जातो. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या पुस्तकांतून तो हुकूम गाळता आला असता; सबंध पुस्तक दडपतां आलें नसते. सर्व पुरावे