पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महंमद व त्याचे तत्त्वज्ञान मतभेद झाले. सीरियाच्या स्वारीवर निघालेल्या सैन्यांत महंमदाच्या मृत्यूची बातमी पोहोंचली त्या वेळीं ओमरला ते खरे वाटेना व ती बातमी सांगणाराला तो मारावयाला सज्ज झाला होता. हे पाहून अबूबकर त्याला म्हणाला, “अरे तूं महंमदाचा उपासक कीं महंमदाच्या ईश्वराचा ? महंमदाचा ईश्वर अमर आहे. महंमद आपल्या सारखाच मर्य होता आणि इतर मत्र्यांप्रमाणेच तो हे जड शरीर सोडून गेला आहे. महंमदानंतर त्याची गादी ज्याला मिळाली, तो महंमदाला देवदूत म्हणाला; अवतार नव्हे. विचाराला घाघ| महंमदाला देवदूत असे संबोधिल्यामुळे त्याचा दर्जा इतर धर्मभिक्षु अगर धर्माचार ठरविणारा इतकाच झाला. अवतार हा ईश्वरी अंश नाही असे म्हटले की एकेश्वरी कल्पना चांगल्याच तहेने सिद्ध होते. आणि एकदां का ईश्वरी अंश आहे असे मानलें कीं, तो परम ईश्वराचे सर्व गुण धारण करणारा बनतो. मग अद्वैताची कल्पना अगर मूळ तत्त्वाचा ऐनजिनसीपणा सिद्ध करता येत नाही आणि हा विरोधाभास दूर करण्यासाठीं कांहीं पोकळ धर्मप्रामाण्ये मांडावीं लागतात. धर्माचे साधे स्वरूप धर्मप्रामाण्य किंवा गूढवाद यामध्ये लोपून जाते. धार्मिक बाबतीत असलेला कडवेपणा नसता तर इस्लामी धर्माला आपले ऐतिहासिक कार्य करतांच आले नसते. अवताराचे ईश्वरीपण हिरावून घेतलें कीं, धर्मग्रंथांचे प्रामाण्यही डळमळते व मग श्रद्धावंताच्या विचाराला वाव मिळतो. मानवी तत्त्वज्ञानाला सनातन सत्याचे वैभव असत नाही आणि धर्मग्रंथांतील नियमांना सनातनत्वाचा मानही मिळत नाहीं. बौद्धिक विकासाची बीजे । - बाराव्या शतकापर्यंत इस्लामधर्माचे सुसूत्र असे प्रमाणभूत सिद्धांत ७७