पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य नव्हतेच. एक देवावर विश्वास ठेवून विविध त-हेचे आध्यात्मिक अनुभव घेण्यास पुष्कळच सवड असे. हे जे स्वातंत्र्य होते त्याचा उपयोग अरब तत्त्वज्ञानी लोक पुरेपूर करून घेत असत. ख्रिश्चन धर्मातील ' त्रयी'चे तत्त्व खोडून काढण्यासाठी परमेश्वराच्या उदात्त कल्पनेचा मानवी बुद्धीला जितका सूक्ष्म विकास करणे शक्य आहे तितका विकास त्यांनी केला. –रेनन अॅट अॅव्हेरोज अॅव्हेरो-इझम पृ. ७६. त्यांची एकेश्वराची तत्त्वप्रणाली अगदीं स्वतंत्र व पौराणिक गोष्टीपासून अलिप्त असल्यामुळेच मुसलमान तत्त्वज्ञांना ही अद्वितीय गोष्ट करता आली. --लँग : भौतिकवादाचा इतिहास. लँग यांनी असेही म्हटले आहे की, महंमदाने स्थापन केलेल्या स्थूल धर्माच्या ठायी सूक्ष्म विकासाचीं बीजें होतीं. एकेश्वरवादामुळे धार्मिक विचाराच्या अतीत जाऊन निवळ आध्यात्मिक विचारपद्धतींत या धर्माची तत्त्वें विलीन झाली. येथेच श्रद्धेचे युग संपले. ग्रीक तत्त्वज्ञान अरब लोकांना कळण्यापूर्वीच मुसलमानी धर्मामध्ये पुष्कळ पंथभेद झाले होते. कित्येक पंथांमध्ये परमेश्वरासंबंधी इतका सूक्ष्म विचार झाला होता की, त्यापुढे त्या बाबतींत विचार होणेच अशक्य होते; आणि इतर धर्मीयांना जे समजू शकत नसे त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. आबासादीसच्या संरक्षणाखाली चाललेल्या बसन्याच्या शाळेत धर्म व श्रद्धा यांची सांगड घालणारा पंथ निघाला होता. प्रारंभींच्या ५।६ शतकांत आकाशांतील व त्यापलीकडील वस्तुजातांचा विचार करणारे तत्त्वज्ञानी नव्हते. त्यांनी कुराण बाजूस ठेवलें व इतर अधामिक पुस्तकांचा अभ्यास करणे हेच अधिक महत्त्वाचे असे ते समजत