Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य स्वतः धर्माचे अगदी उच्च स्वरूप असूनही तो धार्मिक विचारसरणीच्या मुळाशीं घाव घालतो. परमेश्वराचे अधिष्ठान विश्वातीत आणि विश्वाबाहेरचे मानून परमेश्वर आवश्यकच नाहीं हा सिद्धान्त तो स्थापन करतो. धार्मिक विचारसरणीच्या ग्रंथांतील इस्लामधर्म में शेवटचे पृष्ठ असल्यामुळे मानवेतिहासावरील धर्मप्राधान्याचा येथेच शेवट झाला. त्यांतील सहज गुणामुळे जुन्या मीमांसापद्धतीचा त्याने त्याग करून आधुनिक बुद्धिवादाचा त्यांत पाया घातल्याचे दिसून येते. * एकेश्वरी कल्पनेच्या कार्याची तुलना मोठ्या सरोवराशीं करता येईल. त्या सरोवरांत शास्त्राच्या प्रगतीचा पूर येतो आणि शेवटीं बंधारा फुटून जातो. अद्वैत मानणाच्या तीन धर्मापैकी इस्लामधर्म हाच भौतिक वादाला अधिक अनुकूल आहे. अरब संस्कृतीच्या विकासाबरोबरच नव्या स्वतंत्र तत्त्वज्ञानाचा विकास करणारा हा धर्म सर्व धर्मात अगदी तरुणच होय. त्या तत्त्वज्ञानाचा ‘प्रभाव मध्ययुगीन ज्यू लोकांवर व अप्रत्यक्षपणे पाश्चात्य ख्रिस्ती लोकांवर झाला. -एफ्.ए. लँग : भौतिक वादाचा विकास, भाग १ पृष्ठ १७५ व १७७. अवतार की देवदूत ?- या धर्मात अद्वैताचे पूर्ण स्वरूप दृग्गोचर होत असल्यामुळे इस्लामला अभिनव तत्त्वांच्या विकासाचे कार्य करतां आलें. कुराणांतील विचित्र गोष्टी क्रांतिकारक विचारसरणीच्या आड आल्या नाहींत. महंमदाचा कडवा अद्वैतवाद महंमद देवावतार आहे या कल्पनेला विरोधी होत असे. मोझेस, जीझस् वगैरेंना कुराणांत देवदूत मानले होते. परंतु महंमद देवदूत नाही अशी जाहीर रीतीने नसले तरी त्याचे जवळचे लोकच गुप्त रीतीने शंका घेत असत. धर्मसंस्थापक ईश्वरी गुणाचा असावा असे धोरण कुराणाचे नव्हते. याही धोरणाच्या मुळाशीं कडवें अद्वैतच होते. महंमदाच्या मृत्यूनंतर ताबडतोब या बाबतींत त्याच्या अनुयायांत ७६