महंमद व त्याचे तत्वज्ञान कल्पना वर्णन केली होती. म्हणूनच हे बुद्धिवादी धर्म ईश्वराची कल्पना निःसंशय सिद्ध करू शकत नसत आणि म्हणूनच ख्रिश्चन, ज्यू व हिंदुधर्म या सर्वांचा शेवट विश्व व परमेश्वर अभिन्न आहेत या विचारसरणीवर होत असे. म्हणजेच धर्माचा मूलाधार असा ईश्वर सर्वशक्तिमान् व विश्वाहून भिन्न आहे असे मानणे हाच सिद्धांत नाहीसा झाल्यामुळे धर्मच कोलमडून पडत असे. कारण ईश्वर म्हणजेच दृश्य निसर्गात्मक विश्व असे मानणें हें ईश्वरी कल्पनेची मुळांत शंका घेण्यासारखे आहे. कारण त्यामुळे विश्वाचा उत्पादक कोणी आहे असे म्हणता येत नाही. म्हणून परमेश्वराच्या कल्पनेचाही त्याग करावा लागतो. जर जगाचे स्वतःसिद्ध सनातन अस्तित्व मानले तर मग विश्वाचा उत्पत्तिकर्ता मानावयाचें कांहींच कारण नाहीं आणि हे कार्य ज्याचें नाहीं असा परमेश्वर म्हणजे निरवश्यक गृहीत गोष्ट होते. महंमदाचा धर्म हा पेच सोडवितो. प्राथमिक अवस्थेतील बुद्धिवादापासून परमेश्वरी कल्पना दूर करून विश्वाची उत्पत्ति शून्यांतून झाली असे तो धर्म मानतो. सर्व सामर्थ्यसंपन्न व विजयसंपन्न असा परमेश्वर याच धर्मात दिसतो. हें विश्वच नव्हे तर अशा अनंत विश्वांची परंपरा निमण्याची शक्ति असणे हेंच परमेश्वर सर्वशक्तिमान् असल्याचे गमक. अशा त-हेनें ईश्वरी कल्पना प्राथमिक प्रमाणपद्धतीने का होईना स्थापित केली हाच महंमदाचा विशेष होय. आणि म्हणूनच अत्यंत श्रेष्ठ व पवित्र धर्माचा संस्थापक म्हणून तो इतिहासांत गणला जातो. इस्लामी धर्म हा बुद्धिवादी नाही म्हणूनच त्याने इतर धर्मावर संपूर्ण विजय मिळविला. इतर धर्मात आध्यामिक सूक्ष्मता, आधिदैविक सिद्धांत व इतर चांगल्या गोष्टी असूनही ते धर्म पूर्णपणे धर्म या पदवीस योग्य नव्हते. ते 'धर्मस्वरूप' होते. एकेश्वरवादाचे कार्य एकेश्वरवाद हा अत्यंत उलथापालथ करणारा सिद्धांत आहे. ७५
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/72
Appearance