पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य तन्मयतेने करीत असतात. सर्व धर्माचा उगमही असाच आहेइस्लामचा धर्म त्याला अपवाद होता असे मानण्याचे कारण नाहीं. “तो दुस-या एका विचारदृष्टीने अपवाद होता. ईश्वराचा दंड आपल्या पाठीशी आहे एवढ्या एका गोष्टीशिवाय त्यांत प्रामाण्य कशाचेच नव्हते. आधिदैविक विचारांची गुंतागुंतही त्यांत फारशी नव्हती. उलट त्यांत राजकीय दृष्टि, प्रागतिक–सामाजिक तत्त्वे व व्यक्तिगत आचारांचे आदर्श नियमच अधिक होते, निरर्थक आधिदैविक विषयांच्या चर्चा त्यांत नसत. आपल्या बांधवांची सामाजिक स्थिति कशी उन्नत होईल याच गोष्टीकडे त्यांचे लक्ष होते. म्हणूनच स्वच्छता, शांतपणा, उपवास व प्रार्थना या बाबतींत त्याने पुष्कळच नियमितपणा आणला होता. भिक्षा वाढणे आणि दानधर्म करणे हें। त्याला विशेष बहुमोलाचे वाटत असे. कोठल्याही धर्माचा सदाचारी मनुष्य मुक्त होतो, हे त्याने अत्यंत उदारपणे मान्य केले होते. ही उदारता इतर कोणाजवळही त्या वेळी नव्हतीं. —ड्रेपर. ईश्वरी कल्पनेची मीमांसा | महंमदाचे शिक्षण विशेष झालेले नसल्यामुळे कुराणामध्ये बुद्धीची चमक कोठे दिसत नाहीं. सामान्य कल्पना आणि विचित्र तर्क यांनीं तें भरले आहे. महान् धर्माचा स्फूतिप्रद मूलाधार हाच त्याचा एक मोठा गुण आहे. तो या वरच्या सहज दिसणाच्या दोषांना झाकून टाकतो. महंमदाचा धर्म अगदी पूर्णपणे एकेश्वरी होता. म्हणूनच त्यांत तडजोडीची भाषा बिलकूल नाहीं; आणि त्यामुळेच त्याला धर्माचे उच्च स्वरूप प्राप्त झाले. तत्त्वज्ञानाचे दृष्टीने ईश्वराची कल्पना हीच सर्व धर्माचा आधार होय. ही कल्पना विश्वाची उत्पत्ति शून्यांतून (असतांतून) झाली असे मानल्याशिवाय तर्क पूर्ण होऊच शकत नाहीं. हिंदुस्थानमधील व ग्रीसमधील तत्त्ववेत्त्यांच्या बुद्धिवादानें ही विचित्र ७४