पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य सत्ताच आपल्या काबूत ठेवू शकते. जुन्या देवांचा राग झाला तर नव्या देवांची 'दिव्य दयाच' आपले संरक्षण करू शकते. एकाच परमेश्वराच्या सत्तेवरील विश्वासानेच टोळ्यांच्या व गौण देवाच्या जुलुमाचे जू झुगारून देतां येणे शक्य होते. आणि म्हणूनच एकच देव नसला तर तो असणे-शोधणे अवश्य होते. महंमदाच्या विचाराची साखळी ही अशी होती. यांत तोतयेगिरी कांहींच नव्हती. | महंमदानंतर सुमारे एक हजार वर्षांनी बुद्धिवादी व्होल्टेअरने हीच विचारपद्धति मांडली नव्हती का ? परंतु व्होल्टेअरने ही विचारपद्धति प्रतिक्रांतीच्या समर्थनार्थ मांडली होती. सरंजामी राज्यपद्धतीचे संरक्षण एका देवाच्या शोधानेच होणे शक्य होते. म्हणूनच व्होल्टेअरने या राज्यपद्धतीचा पुरस्कार केला. परंतु महंमदाच्या वेळी सदर तत्त्वपद्धतीच्या पुरस्कारानें क्रांतीची पाउले पुढे पडली. अतिमानुषावर ज्या वेळी जनतेचा विश्वास असतो त्या वेळी प्रत्येक अभिनव कल्पना तिच्याशी जुळती आहे, असे दाखविले तरच जनतेचा तिला पाठिंबा मिळतो. शिवाय या कल्पनेच्या शोधाचा जनक महंमद नव्हेच. मागील प्रकरणांत सांगितलेल्या सामाजिक स्थितीमुळेच या कल्पनेचा विकास झाला होता. महंमदाचे कार्य त्या कल्पनेच्या सिद्ध्यर्थ पुरावा पाहणे एवढेच होते; आणि जनतेची खात्री करावयाची तर त्यांना हवा तोच पुरावा पुढे केला पाहिजे. ईश्वराचे दर्शन महंमदाच्या शोधाच्या मुळाशीं व्होल्टेअरप्रमाणे निराशा नव्हती. उत्साहाने उत्स्फूर्त झालेल्या अज्ञ माणसांचा तो प्रामाणिक प्रयत्न होता. अरब राष्ट्राच्या या मुक्तिदात्याने देव शोधण्यासाठी एकांतांत ध्यान, उपवास व प्रार्थना या आजही चालू असलेल्या नित्याच्या गोष्टी सुरू केल्या व त्यांचा परिणामही नित्याप्रमाणेच झाला. त्याला साक्षात्कार झाला, ईश्वराने साकार दर्शन दिले आणि गूढ ध्वनींनीं ७२