महंमद व त्याचे तत्त्वज्ञान * तूच अवतार आहेस' असे सांगितले. या ध्वनींत वृक्षपाषाणादिकांनी आपला ध्वनि मिसळून दिला. ध्यान, धारणा या मार्गाचा अवलंब करणा-यांच्या मेंदूवर कांहीं परिणाम घडून असे अनुभव नेहमी येतात. कोठल्याही विचित्र व काल्पनिक वस्तूवर आपले मन इतर सर्व गोष्टींचा विचार सोडून, एकाग्र केले तर त्यांना मूर्त स्वरूप येते. सर्व साक्षात्कारी लोकांच्या मनाचा अभ्यास केला तर ‘अंतःस्फूति' अगर धार्मिक अनुभव' म्हणून जे कांहीं होते ते सर्व म्हणजे ध्यानधारणा इत्यादिकांच्या अभ्यासाने उत्पन्न झालेली विशिष्ट मनोवस्था होय. पत्नीने प्रचीति पटविली महंमदाची मनश्चर्याही त्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतर झालेल्या साक्षात्कारी लोकांसारखी होती. परंतु त्याच्या बाबतींत एक विशेष गोष्ट आहे. प्रत्येकाच्या अनुभवाला येणा-या 'मनोवस्थेनें -भुलून जाऊन आपणास आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सांपडला असे न मानण्याइतका तो चतुर होता. त्याला आपण वेडे होत आहों कीं काय अशीही भीति वाटू लागली होती. अगदीं ऐन वेळी त्याच्या हुषार बायकोने वेळीच मदत केली नसती तर त्याने आपला प्रयत्न मध्येच सोडूनही दिला असता. आपल्या पतीच्या आध्यात्मिक अनुभवाचे महत्त्व ओळखून त्याचा उपयोग करून घ्यावयाचा असे खदिजानें ( महंमदाच्या बायकोने ) ठरविले. ती मोठी श्रीमंत व्यापारी होती. तिने त्याचे मन वळविले व असा विश्वास उत्पन्न केला की, त्याला जें कांहीं दिसे ते ईश्वरी साक्षात्कारच होय. त्याच्या मनाच्या सूचकतेचा फायदा घेऊन तिने त्याच्या खोलीत देवदूत दर्शन देण्यास येत आहेत असे त्यास विश्वासपूर्वक वाटावयास लावले. अर्थात् हे नाटक अज्ञानी लोकभ्रम व पूर्वग्रह यांच्या पाश्र्वभूमीवरच घडणे शक्य आहे. मुख्य पात्रे आपले काम भरमानें ७३
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/70
Appearance