Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें महंमद व त्याचे तत्त्वज्ञान “ मानव वंशावर सर्वांत अधिक परिणाम करणायामध्ये महंमदइस्लामधर्माचा संस्थापक-हा प्रमुख आहे." –ड्रेपर : यूरोपच्या बौद्धिक विकासाचा इतिहास. दिव्य साक्षात्कार झाला असे तो म्हणेतोंपर्यंत महंमदापाशीं विशेष कांहीं नव्हते. इतर सर्व धर्मावतारांना साक्षात्कार झाला हे जितकें संशयास्पद किंवा काल्पनिक असते, त्याहून महंमदाला साक्षात्कार झाला हें कांहीं वेगळे नव्हते. ख्रिस्ती दुरभिमानी लोक महंमदाला तोतया म्हणत असत. पण तोतया ही संज्ञा मोझेस आणि जीझस या दोघांनाही मिळाली होतीच ! 'तीन तोतये' या नांवाच्या एका पुस्तकानें मध्ययुगाचे अखेरीस युरोपभर खळबळ उडवून दिली होती. या ग्रंथाच्या कर्तृत्वाचा मान ख्रिश्चन अधिराजा फ्रेडरिक किंवा मुसलमान तत्त्ववेत्ता अॅव्हेरोज यांना देतात. साक्षात्काराची उपपत्ति-- | दिव्य साक्षात्काराची कल्पना सामान्य जनतेत सत्यकथा म्हणून रूढ होण्यास जे लोक कारणीभूत झाले त्यांच्या भूमिकेहून भिन्न अशी कोणतीच भूमिका ' तोतया महंमदाने ' घेतली नव्हती. राष्ट्रीय ऐक्य घडावे अशी कल्पना त्याला आली. ती सफल होण्यास आपल्याला अतिमानुष दैवी पाठिंबा आहे हे जनतेस कळणे जरूर आहे हे त्याने पाहिले. जुन्या अज्ञानी विचारांची पक्कड ज्यांचेवर आहे अशांना दुस-या कोठल्याही युक्तिवादाने एकादी गोष्ट पटवून देणे शक्य नसते. गौण देवांच्या इच्छाशक्तीला परमेश्वरी ७१