पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विजयाची कारणपरंपरा करण्यास शिकविले आहे. हे धर्माधिकारी विसरून गेले होते. उलट रोमन लोकांना मान द्या असे सांगणारा दुर्बल अजापुत्रच अशा त-हेने ते येशू ख्रिस्ताचे जीवनचित्र रंगवून दाखवीत होते. त्यांनी त्यामुळे ख्रिश्चन धर्माची पार्श्वभूमि-ज्यू लोकांचा इतिहास-विकृत करून टाकिली होती. वरिष्ठ वर्गाशी तडजोड केल्यामुळे नव्या युगाला योग्य अशा नव्या समाजरचनेचा पाया घालण्याचे कर्तव्य ख्रिश्चन धर्म करू शकला नाहीं. विश्वविजयाच्या स्वारीचे नेतृत्व तो स्वीकारू शकला नाहीं. दलितांना त्याने मदतही केली नाही. उलट भावी कालांत सर्व सुखसमृद्धि येणार आहे अशी जनतेची फसवणूक केली. स्वर्गाचे द्वार दुर्बलांसाठीच उघडे राहील याचा अर्थ असा की, सत्ताधीश वर्गाचे वर्चस्व व जुलूम इहलोकीं जे मान्य करतील त्यांनाच फक्त स्वर्गात (मेल्यावर) प्रवेश मिळावयाचा ! ख्रिश्चन धर्माचे बांध फुटल्यामुळे नवीन प्रभावी धर्माची आव| श्यकता इतिहासाच्या क्षेत्रांत भासू लागली होती. इस्लामी धर्माने नुसत्या पारलौकिक स्वर्गप्राप्तीची लालूच दाखविली नाहीं, तर भौतिक विश्वावर विजय मिळविण्याची स्फूति देखील दिली. महंमदाने आपल्या लोकांनाच राष्ट्रीय ऐक्याचे व्यासपीठ निर्माण करून दिलें असें नाहीं, तर आपल्या अरब बांधवांच्या हातीं अभिनव क्रांतीचा दीप दिला आणि त्याच्या दिव्य प्रकाशांत शेजारच्या सर्व देशांतील दलित व अकिंचन जनता एकत्र गोळा झाली. | इस्लामधर्माच्या विजयाची कारणे सामाजिक, आध्यात्मिक व राजकीयही आहेत. गिबनचे या बाबतींतील मत असे आहे : | "झोरॉऑस्टरपेक्षा अधिक पवित्र पद्धति व ज्यू लोकांचेपेक्षा अधिक | उदार कायदे यामुळे महंमदाचा धर्म इतर गूढ विचारांवर आरूढ असलेल्या धर्मापेक्षा अधिक तर्कसुसंगत वाटतो. विशेषतः सातव्या शतकामध्ये रूढीमुळे ' शुभवर्तमान' अत्यंत विकृत झाले होते. " -रोमन साम्राज्याचा न्हास व नाश. चयक ६९