Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य स्वामित्वाचे स्वागत आणखी एका इतिहासकाराची साक्ष याच बाजूने आहे. तो म्हणतो : * इस्लाम धर्माचा ध्वज पुढे पुढे चालला त्याचे कारण त्यांतील स्वातंत्र्य व समता ही तत्त्वे हेच होय. अरबांनी जे ख्रिश्चन प्रदेश जिंकले तेथे गमतीची गोष्ट ही कीं, अरबांची प्रगति झाली आहे या भावनेनेच सामान्य बहुजन मुसलमान धर्माकडे आदराने पाहात असत. ख्रिश्चन सरकारांना हें लांच्छनास्पद आहे की त्यांची बहुतेक ठिकाणची राज्यव्यवस्था जुलुमी होती. सीरियाच्या रहिवाश्यांनीं महंमदानुयायांचे स्वागतच केलें. इजिप्तच्या लोकांनी आपला देश अरबांच्या हातीं जावा असे प्रयत्न केले; आफ्रिकेतील स्वारींत बर्बरांनी मदत केली. कॉन्स्टॅटिनोपलच्या सरकारच्या विद्वेषामुळे या सर्व राष्ट्रांना आपले देश अरबी सत्तेच्या स्वाधीन व्हावेत असे वाटलें. सरदारांनी केलेला विश्वासघात आणि सामान्य जनतेचे औदासिन्य यांमुळेच स्पेन आणि दक्षिण फ्रान्स यांची आहुति अरबांना मिळाली. 99