Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य तरवारीपेक्षां तेजस्वी अगर तीव्र आहे असे वाटत नसे. आपण आपल्या देशाचे सेसॉस्त्री, सिरस्, अलेक्झेंडर आणि डॅरिअस् पाम्पे, अशिरवान्, टॉलमी आणि टूजन यांच्या सैनिकांपासून संरक्षण करण्याचे कामीं कोणीही अरबांइतकाच भाग घेतला आहे असा अभिमान वाटे. एकाद्या करमणुकीच्या खेळांतही आपण इतर कोणाइतकेही प्रवीण असू शकतों असे त्यांस वाटत असे. परंतु इस्लामने समतेची उद्घोषणा करतांच इतर लोकांवर अत्यंत आश्चर्यकारक परिणाम घडून आला. अरब-विजयाचे श्रेय तरवारीच्या धारेस जेवढे आहे, निदान तेवढेच श्रेय इस्लामच्या या समतेच्या घोषणेस द्यावे लागेल. या घोषणेनें रोम, बायझंटाइन, इराणी व हिंदी साम्राज्याच्या वर्गयुक्त समाजरचनेत असलेले कायदे किती भयंकर जाचक असतात हे विरोधाभासाने निदर्शनास आणले. अधोगामी संस्कृतीच्या जुन्या प्रदेशांतून समता आणि स्वातंत्र्य यांचे तत्त्व व महत्त्व पायदळी तुडविले जात होते; उलट इस्लामी संस्कृति ते संरक्षिण्यासाठी होती. ख्रिश्चन धर्माची विकृति जुन्या संस्कृतीचा अभिमानास्पद असा आध्यात्मिक वारसा अरबांना मिळाला होता. तेव्हां जुन्या अवशेषाच्या भाराखाली चिरडल्या जाणाच्या मोठ्या दुर्दैवी समाजाबरोबरच त्या संपत्तीचा उपभोग घेणे हे त्यांचे कार्य होते. त्या वेळची परिस्थिति इस्लामच्या अभिवृद्धीस अत्यंत अनुकूल होती. जुन्या संस्कृतींतील सत्ताधीश वर्गाच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक -हासाच्या वेळीच इस्लामचा उदय झाला. सामाजिक अवनतावस्थेबद्दल असमाधान, कुजट मनोवृत्ति आणि जुलूम या मुळे बहुजन समाजांत नवी चांगली समाजघटना निर्माण व्हावी अशी तीव्र आकांक्षा व धडपड निर्माण झाली होती. ख्रिश्चन धर्माने जुन्या संस्कृतीचा आश्रय केल्यामुळे " आहे ते टिकवून धरावे' या वृत्तीची कैफियत त्याला मांडावी लागे. येशू ख्रिस्तानें रोमन वर्चस्वाविरुद्ध क्रांति | ६८