पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विजयाची कारणपरंपरा पंथाचा अधःपात थांबवून ख्रिश्चन धर्माला पूर्वपद मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांत खलिफांची सक्रिय मदत होत असे. सहिष्णुतेची उदाहरणे| सत् आणि असत् ही दोन्ही तत्त्वे सनातन आहेत हे झोरॉऑस्टर पंथाचे घातक तत्त्व एकेश्वरी पंथीयांना अगदींच चुकीचे वाटे. परंतु त्या पंथीयांसही अरब लोक सहिष्णुतेने वागवीत असत. हेजीराच्या तिस-या शतकापर्यंत साधीं मुसलमानी प्रार्थनामंदिरे वैभवसंपन्न अग्निमंदिरासमोर विनयाने उभी होती. या वैभवाचा विध्वंस इस्लामच्या निघृण तरवारीने केला नाही तर त्यांचा विनाश अवश्यंभावी होता. त्या पंथाचे भक्तगण तो पंथ, वठलेल्या वृक्षाप्रमाणे सोडून जात होते. तैग्रिस ते ऑक्सस याच्यामधील प्रदेशांतील पशयनांनी आपल्या रूढी व धर्म यांचा त्याग अत्यंत जलद केला. कितीही दडपशाही व छळ झाला तरी सर्व राष्ट्रच्या राष्ट्र आपल्या सनातन धर्माचा त्याग इतका अल्प विरोध दाखवून करणारच नाही. परंतु जुना धर्म अवनत झाला होता, सुसंस्कृत जनतेची आध्यात्मिक भूक भागविण्यास असमर्थ होता, खरीमनने अग्नि आणि सूर्य या देवांस ग्रासून टाकले होते. दुष्ट तत्त्वाच्या जाचांतून सोडवणूक व्हावी व होईल म्हणूनच महंमदाचे अद्वैताचे साधे तत्त्व त्यांनी स्वीकारले. मोडकळीस आलेला ख्रिश्चन धर्म आफ्रिकेच्या उत्तरेस अलेक्झेंड्रिया ते कार्थेज या प्रदेशांतच फक्त इस्लाम धर्माच्या उदयाने ख्रिश्चन धर्म पूर्णपणे नष्टमात्र झाला होता.. तेथेही या सर्वभक्षक धर्मक्रांतीचे खरे कारण नवधर्माने केलेली सक्ति हे नसून जुन्या धर्माची अवनति व त्यामुळे उत्पन्न झालेली अगतिकता व निराशा हेच होय. सिप्रिअन, अथेन्सिअस व अगस्टाईन यांच्या शक्तियुक्तीनें स्थापिलेला जीजसचा धर्म एरिअन डोनॅटिस्टॅच्या दुष्ट