पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य पाळले असे नसून अरबांचे वर्चस्व होते, तोपर्यंत अखंड पाळले जात होते. इस्लामचे कार्य संपल्यावर व रानटी तार्तरांचे वर्चस्व सुरू झाल्यावरच या धोरणाचा त्याग करण्यांत आला. तुर्की सुलतानांच्या अमलाचे वेळीही हे धोरण पूर्णपणे सोडून देण्यांत आले नव्हते. बुद्धिवादाचा विकास वैभवाच्या काळांतील या धोरणाने व विचारस्वातंत्र्यामुळे बुद्धिवादाचा विकास झाला. किंबहुना कट्टर सनातनी यामुळेच या नव्या कल्पनांना अधमक व काफिरी असे संबोधू लागले. आरंभींचे कांहीं खलिफा नुसते नव्या शास्त्रांचा अभ्यास करून स्वतंत्र विचार करीत असत एवढेच नव्हे तर मोटॅसेनसारखे कांहीजण कुराणच्या अपौरुषेयत्वावरही विश्वास ठेवीत नसत. | दलित ज्यू व ख्रिश्चन यांना व इतर नवविचारपंथीयांना अरबांचे साम्राज्य शरण्यच होऊन बसले होते. अरब साम्राज्याचे दृढीकरण झाल्यानंतर ख्रिश्चन कॅथॉलिक लोकांनाही या सहिष्णुत्वाचा फायदा मिळाला. या गोष्टीला अनेक ख्रिश्चन इतिहासकारांचाही आधार आहेच. उदाहरणार्थ रेनौडॉट हा इतिहासकार लिहितो: 4 इजिप्तमधील मुसलमान मॅजिस्ट्रेट हे धर्मगुरु, कुलपति, धर्माधिकारी वगैरे लोकांचे हक्क दर्जा, व अंतर्गत कारभाराचे वातंत्र्य पूर्णपणे रक्षण करीत असत. त्याचपैकीं कांहीं ख्रिश्चन कार्यवाह अगर वैद्य होत असत. कांहीजण जमिनीच्या उत्पन्नावर श्रीमंत झाले आणि कित्येकांना शहर अगर प्रांताधिकारी बनवून त्यांचा गुणगौरव केला जात असे." एका खलिफान इराणचे राज्ययंत्र चालविण्यास ख्रिश्चन लोक विश्वासार्ह आहेत असे उद्घोषित केले होते. प्रॉटेस्टंट सुधारकांचे आद्य प्रवर्तक पालिशिअन यांना उपासनेचे स्वातंत्र्यच होते एवढेच नव्हे तर कॅथॉलिक ६४