इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य चालींनी व कॅथॉलिक पंथीयांनीं विपरीत केला. म्हणूनच दरिद्री जनतेने त्याचेविरुद्ध बंडाचे निशाण उभारले. त्या वेळीं आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेले देश अगदी दरिद्री होऊन गेले होते. त्यानंतरच व्हेंडाल व मूर लोकांच्या हल्ल्यांनी आधीच दीन झालेले देश अधिक उजाड करून टाकले. त्यामुळे सर्व जनतेची आध्यात्मिक व आधिभौतिक दुर्दशा झाली व संन्यासधर्माचा आश्रय करून स्वतःचे भ्रामक समाधान करून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. सामाजिक गोंधळाच्या व आध्यात्मिक नैराश्याच्या त्या तमोमय काळांत अरबस्थानांतील अवतारी पुरुषाचा आशादायक व तेजस्वी संदेश प्रदीप्तपणे चमकला व आशेची दिव्य ज्योतीच जणू त्या संदेशाने प्रदीप्त केली. नवीन धर्माने मिळणा-या भौतिक व पारलौकिक सुखाशेनें हजारों लोकांची मने आकृष्ट झाली. भौतिक जीवनांत पराभूत झाल्यामुळे निराश होऊन ज्यांनी अतिमानुषाच्या अस्तित्वावर विश्वासून आपणास रूढीच्या खड्यांत बुडवून घेतले होते, त्यांना इस्लामी धर्माच्या जयशाली तुतारीने जागे केले. नैसर्गिक जीवनाचा मनमुराद उपभोग घेण्याची संधि मिळाल्यामुळे अवनत ख्रिस्ती धर्माने प्रसृत केलेल्या संन्यासवादाच्या विकृत कल्पना पार नाहीशा झाल्या. आशेचे नवें क्षितिजच सामान्य जनतेला दिसले. या आघातामुळे प्रत्येकाला आपल्या सामर्थ्याची व धैर्याची पराकाष्ठा करून पाहण्यास संधि मिळाली. इस्लामच्या स्फूतिदायित्वामुळे अरबांच्या सुराज्यांतच उत्तर आफ्रिकेतील सुपीक जमीन व उद्योगी जनता सुफल व संपन्न झाली. अवनतीचे स्वरूप अरबस्थानची प्रगति निव्वळ तरवारीच्या जोरावर झाली असे म्हणणे अगदीं चुकीचे आहे. तरवारीने धर्माचे नाममात्र रूप पालटेल परंतु जनतेची सदसद्विवेक बुद्धि कांहीं पालटत नाहीं. महंमदी धर्माचे तर्कशास्त्र विचारणीय होते. परंतु त्याच्या प्रसारापूर्वी आशिया ६६
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/63
Appearance