पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विजयाची कारणपरंपरा दोन सोन्याची नाणीं प्रतिवर्षी देत असे. पाकस्तानची यात्रा लोकांना उत्तेजन देऊन करविली जात असे. त्यामुळे व्यापाराच्या वृद्धीस उपयोग होतो हे मुसलमान जेत्यांनी ओळखले, हे तर त्यांच्या मुत्सद्देगिरीचे लक्षण आहे. धर्मयुद्धांच्या शेवटी ज्या वेळी जेरुसलेम परत देण्यांत आले त्या वेळी तेथील ‘पौर्वात्य' ख्रिस्ती लोकांना अरव खलिफांच्या सहिष्णु राज्याची अत्यंत आठवण होत असे." -रोमन साम्राज्याचा उदयास्त : गिबन. ? आतां हैं चित्र पहा खिश्चन लोकांनी शहरांत प्रवेश मिळविल्यानंतर याच्या उलट काय केले त्याचा खालील वृत्तांत विशेष उद्बोधक वाटेल. खाजगी अगर सार्वजनिक मालमत्तेच्या लुटालुटींत आरंभीं जो जे मिळवील त्याचा तो मालक हाच दंडक पाळला जाई. वेड्या ख्रिस्ती भक्तांनी आपल्या देवाला रक्ताचा अभिषेक केला. विरोधाने त्यांचा क्रोधाग्नि भडकतच असे. स्त्रिया आणि सज्जन यांनाही तो शांत करतां येत नसे. पुढेमागे न पाहतां तीन दिवस त्यांनी कत्तल चालविली होती. सत्तर हजार महंमदानुयायी यांची कत्तल करून व किती तरी ज्यू लोकांना स्वस्थानीं अग्निकाष्ठे चारूनही, अनेक लोक त्यांच्या बंदींत होते. तेही मारण्याचा निव्वळ कंटाळा आला होता म्हणूनच वाचण्याइतके दुर्दैवी होते." -रोमन साम्राज्याचा उदयास्त : गिबन. जुने व नवे, मुसलमान व युरोपियन अशा अधिकारी इतिहासकारांच्या पुराव्याची छाननी करून गिबनने असे सिद्ध केले आहे कीं, महंमदाने आपल्या ख्रिश्चन प्रजाजनांना व्यक्तिस्वातंत्र्याबरोबरच व्यापार व मालमत्ता यांचेही स्वातंत्र्य दिले होते. उपासनेचे तर स्वातंत्र्य होतेच होते. सहिष्णु असण्याचे लाभदायी धोरण महंमद व त्याचे एक दोन वंशज यांनी