इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य साठी असलेली तिसरी गोष्ट त्या अंधारांत दडून गेली आहे. बहुजनसमाज त्या तिस-या गोष्टीचीच निवड करीत असे. त्या गोष्टींत इस्लामचे मर्म बीज सांठविले आहे. वस्तुतः निवडीसाठी ज्या दोन गोष्टी लोकांपुढे मांडण्यात येत त्या अगदी भिन्न होत्या. कुराणाचा स्वीकार करा किंवा अरब जेत्यांना मान द्या. या त्या दोन गोष्टी होत. * दिव्य तरवार' फक्त कोणत्याच गोष्टीची निवड न केली तरच, पजली जात असे. एरव्हीं ती नेहमी म्यान असे. ज्या आर्थिक हितसंबंधांतून एकेश्वराची कल्पना निघाली त्या आर्थिक संबंधामुळेच अरब लोक अकारण रक्तपातास तयार नसत. ज्या प्रदेशांतून व्यापाराचे मार्ग असत, ते प्रदेश जिंकून एकछत्री राज्याखाली आणणे अवश्य होते. हा हेतु सफल तेव्हांच होतो की, जेव्हां जित लोक नवीन धर्माचा स्वीकार करतात; कारण धर्माच्या आधाराने नवीन एकछत्री राज्य भक्कम पायावर उभारल्यासारखे होते. उत्पादन आणि विभाजन हे व्यापाराचे मुख्याधार होत. म्हणून कारागीर व शेतकरी यांची, त्यांनी कुराणाचा स्वीकार केला नाही म्हणून, कत्तल करणे सुसंगत नव्हते. तसे करण्याने मोठमोठ्या समृद्ध शहराच्या बाजारपेठा नाहींशा होतात. नवीन धर्म स्वीकारणाच्यावर संपूर्ण ताबा असणेच फक्त अवश्य होते. महंमदाच्या अनुयायांचे राज्यांत काफीर लोकांना आपल्या श्रद्धेप्रमाणे अन्य व भिन्न देवतांची उपासना करतां येत असे. सहिष्णुतेचा दाखला-- | "जेरुसलेम ज्या वेळीं ओमर खलीफाच्या स्वाधीन करण्यांत आले, त्या वेळी तेथील रहिवाश्यांना यत्कचित्ही त्रास देण्यांत आला नाहीं; इतकेच नव्हे तर त्यांची मालमत्ता त्यांच्या स्वाधीनच होती व त्यांच्या उपासनेत कसलाही व्यत्यय आला नाहीं. ख्रिस्ती लोक, त्यांचे धर्मगुरु व त्यांचे कुलपती यांसाठी त्या शहरांत स्वतंत्र विभाग राखून ठेवण्यांत आला होता; आणि या संरक्षणासाठी सर्व ख्रिस्ती जात फक्त ६२
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/59
Appearance