पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथे विजयाची कारणपरंपरा ऐतिहासिक आणि सामाजिक पाइ र इस्लाम धर्माचे चित्र सहिष्णुत्वाचेच असावे असे दिसते. परंतु अशुद्ध अंध दृष्टीच्या लोकांकडून इस्लाम धर्माची सांगड धर्मवेडाशींच घालण्यांत येते आणि यामध्ये कांहीं विरोधाभास नाहीं. इस्लाम धर्माचे आधारभूत तत्त्व अद्वैत आहे; आणि ते आहे म्हणजेच इस्लाम धर्म हा सहिष्णु आहे. सर्व चराचर विश्व, त्यांतील दोष आणि दुर्गुण, सर्व गुणावगुणांसह-अखिल मानव्य, एकाच परमेश्वराची ' सृष्टि' आहे, असे मानणे इस्लामानुयायांचे कर्तव्य आहे. या उदात्त तत्त्वावर विश्वास ठेवणारा कोणताही मनुष्य निसर्गाच्या दोषाबद्दल हळहळेल आणि मनुष्याच्या विचित्रपणाबद्दल त्याला उपहासही वाटेल. परंतु त्याच्या श्रद्धेनुरूप त्याला हे दोष आणि दुर्गुण ही एकाद्या अन्य दुर्दैवाची निमति आहे असे मानता येणार नाहीं; व देवाविरुद्ध त्याला बंडही करता येणार नाही. जे अन्य देवतांची उपासना करतात ते वाट चुकलेले वाटसरू आहेत असे त्याला मानावें लागते. ते मोक्षाला लायक होईपर्यंत त्यांना सहिष्णुत्वाने वागवून योग्य मार्गावर आणावयाचे तर एकाच पित्याचीं तीं सारीं लेंकरें आहेत असे इस्लामच्या अनुयायांस समजावे लागते. कुराण की समशेर ?- कुराण किंवा तलवार या दोन्हींपैकी एकाची निवड करावयास लावणा-या महंमदांच्या अनुयायांनी जी भयंकर दृष्टि ठेविली होती तीमुळे इस्लामच्या अभ्युदयाचा इतिहास काळवंडून गेला आहे आणि निवडी ६