पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य तम्य कळू लागते. अवलोकन आणि औत्सुक्य यांच्या योगाने वाटेल त्या गोष्टीवर अंधश्रद्धेने विश्वास ठेवण्याची संवय मोडून जाते आणि चिकित्सक विचारांच्या विकासामुळे ज्ञानदेवीच्या मंदिरांत प्रवेश करण्यास हा मनुष्य अत्यंत पात्र होतो. तात्त्विक विचाराची संवय त्याला चांगली लागते. त्याची दृष्टि फक्त फायद्यावर असते. वस्तु कोणती का असेना आपण खरेदीविक्री करितों त्यांतून कांहीं निष्पन्न होते की नाहीं एवढेच तो पाहात असतो. वस्तंच्या स्वाभाविक मूल्यापेक्षा त्यापासून फायदा किती होईल इकडेच त्याचे लक्ष असते. तत्वज्ञानाची भूमिका १ विविध व विचित्र गोष्टींकडे सहानुभूतीने पाहणे, त्यांचा अर्थ समजावून घेणे, पूर्वग्रहापासून अलिप्त राहून त्या अवलोकन करणे, चिकित्सक दृष्टीने तात्त्विक विचार करणे याच तर तत्त्वज्ञानाच्या मूळ आवश्यक गोष्टी आणि या गुणांचा समुच्चय व्यापार करण्याला आवश्यक असतो. दिव्य ज्ञान म्हणून अनेक लोकभ्रम मानणाच्या लोकांचे अनेक आचार आणि संस्कार पाहून किंवा पुष्कळ वेळा दुरभिमानाने मानलेल्या दुराग्रहांना चिरंतन सत्य म्हणतांना पाहून व्यापा-याला हंसू येते. आणि तो अंधश्रद्धेचा तिरस्कार करू लागून सर्व वचनांच्या व आचारांच्या मुळाशी असलेल्या सामान्य तत्त्वांना गौरवाने मानू लागतो. चीन ते स्पेन अरब साम्राज्याच्या एकछत्राखाली आलेल्या सर्व देशांतून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे, विचारांचे दळणवळण सुरू झाले होते. सिथियन हल्ल्यांमुळे आणि बायझंटाइन साम्राज्याच्या घातुक आर्थिक धोरणामुळे चीनशीं व्यापार करण्याचे उत्तरेकडील मार्ग धोक्याचे ४८